जाहिरात

US-Israel Iran War : दुबईतील 'या' शहरात अडकले मुंबई, पुणे, कोल्हापुरातील विद्यार्थी, थक्क करणारा फोटो आला समोर

इराणने काल शनिवारी दुबईच्या बुर्ज खलिफा इमारजीजवळ क्षेपणास्त्र हल्ला चढवला. त्यानंतर संपूर्ण जगभरात मोठी खळबळ उडाली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातही अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. अशातच अनेक भारतीय परदेशात विविध ठिकाणी अडकले आहेत.

US-Israel Iran War : दुबईतील 'या' शहरात अडकले मुंबई, पुणे, कोल्हापुरातील विद्यार्थी, थक्क करणारा फोटो आला समोर
Maharashtra Students Stuck In Dubai
मुंबई:

विशाल पुजारी, प्रतिनिधी 

US-Israel Iran War Latest Update : इस्त्रायल,अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या भीषण युद्धाचा फटका मिडल इस्ट देशांना बसला आहे. इराणने काल शनिवारी दुबईच्या बुर्ज खलिफा इमारजीजवळ क्षेपणास्त्र हल्ला चढवला. त्यानंतर संपूर्ण जगभरात मोठी खळबळ उडाली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातही अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. अशातच अनेक भारतीय परदेशात विविध ठिकाणी अडकले आहेत. कोल्हापुरातल्या एका इन्स्टिट्यूट मार्फत काही विद्यार्थी जॉर्जियाकडे निघालेले. मात्र ते दुबई पासून जवळच असलेल्या एका शहरात विमान नसल्यामुळे अडकून पडले आहेत. यामध्ये मुंबई पुण्यातील सात विद्यार्थांचा समावेश असल्याची माहिती समोर आलीय.

विद्यार्थ्यांंना जॉर्जियाकडे जायचं होतं, पण अचानक..

मिळालेल्या माहितीनुसार,विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जॉर्जिया या ठिकाणी जाणार होते.यामध्ये मुंबई आणि पुण्यातील सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे तरुण पहिल्यांदाच परदेश वारीसाठी निघाले होते. त्यांना अरब देशातील शारजाह या ठिकाणी थांबावं लागलं. कोल्हापुरातल्या विश्व एज्युकेशन इन्स्टिट्यूटकडून त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. त्या इन्स्टिट्यूटचा केअर टेकर सोबत असल्यामुळे विद्यार्थी एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. मात्र इराण इस्त्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढच्या प्रवासात मात्र मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सर्व विद्यार्थी सुरक्षित असून वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधत असल्याचं विश्व एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांनी सांगितलं आहे. 

नक्की वाचा >> Nagpur Blast : 'महिला धडाधडा पेटत होत्या', 17 हजार महिना पगारासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या महिलेचा भीषण अनुभव

28 फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळावरून निघाले अन्..

कोल्हापुरातील विश्व एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांशी एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला. या इन्स्टिट्यूटचे प्रमुख ज्ञानेश्वर भस्मे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे सात विद्यार्थी एमबीबीएस शिक्षण घेण्यासाठी जॉर्जियाकडे रवाना झाले आहेत. या इन्स्टिट्यूटच्या केअर टेकरसह तीन मुली आणि तीन मुलं अशा सात जणांचा समावेश आहे. हे सर्व जण 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता मुंबई विमानतळावरून निघाले होते. जवळपास 3 तासानंतर अरबमधील शहारजा या विमानतळावर पोहोचले. लुपॉलमुळे ( दुसरे विमान वेळेपर्यंत असलेला मधला काळ) त्यांना काही काळ शहारजा याच विमानतळावर थांबावं लागणार होतं. शहरजा दुसऱ्या विमानाने जॉर्जियाकडे निघायचं होतं. मात्र दरम्यानच्या काळात जॉर्जियाला जाण्यासाठी असलेलं विमान रद्द झाल्यामुळे शारजाह या ठिकाणीच त्यांना मुक्काम ठोकावा लागला. 

शारजाह या ठिकाणापासून दुबई साधारण 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इन्स्टिट्यूटचा केअर टेकर सोबत असल्यामुळे या सगळ्यांची विमानतळापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्यांदाच निघालेल्या या तरुणांना युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. विश्व एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांनी सर्व विद्यार्थी सुरक्षित असून वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधत असल्याचं सांगितला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com