Mojtaba Khamenei Gay Claim : इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धादरम्यान एक हैराण करणारं वृत्त समोर आलं आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या अहवालामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेता मोजतबा खामेनी समलैंगिक असू शकतात असं यात म्हटलं आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क पोस्टने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात याचा उल्लेख करण्यात आला आहे.
रिपोर्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, गुप्तचर अधिकारी आणि व्हाइट हाऊसशी संबंधित एका सूत्रानुसार, गेल्या आठवड्यात एक गोपनीय ब्रीफिंग झाली होती. यामध्ये अमेरिकन एजन्सीने केलेल्या समीक्षांची माहिती शेअर करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना मोजतबा खामेनी गे असल्याची माहिती देण्यात आली, त्यावेळी तेदेखील हैराण झाले. या ब्रीफिंगशी संबंधित एका व्यक्तीने सांगितलं की, बैठकीत सामील अन्य लोकांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
मोजतबा खामेनी यांच्याबाबत काय म्हटलंय?
या अहवालात सूत्रांच्या हवाल्यातून दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा या दाव्यावर विश्वास आहे. अद्याप याबाबत कोणताही फोटो किंवा इतर पुरावा समोर आलेले नाहीत. एका सूत्राने सांगितलं की, ही माहिती एका अत्यंत सुरक्षित स्त्रोताकडून मिळाली आहे.
शिक्षकासोबत लैंगिक संबंध...
रिपोर्टनुसार, अमेरिका गुप्तचर संस्थेचं म्हणणं आहे की, मोजतबा खामेनी यांचे त्यांच्या लहानपणाच्या शिक्षकासोबत लैंगिक संबंध असू शकतात. रिपोर्टमधील सूत्रांनी सांगितलं की, अनेक वर्षांपर्यंत दोघं एकत्र होते.
उपचारासाठी युकेमध्ये...
इराणचे नवे सर्वोच्च नेता मोजतबा खामेनी काही काळापूर्वी उपचारासाठी युकेत गेले होते. हा उपचार नपुंसकतेशी संबंधित होता. अद्याप याबाबत कोणताही ठोस पुरावा मिळू शकलेला नाही. ही बाब अत्यंत संवेदनशील आहे. कारण इराणमध्ये समलैंगिकता बेकायदेशीर आहे. येथे समलैंगिक संबंधावर कडक कायदेशीर कारवाई केली जाते.
(वरील माहिती न्यूयॉर्क पोस्टने प्रसिद्ध केलेल्या वृत्तावर आधारित आहे. NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world