Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?

मुंबई (BMC), ठाणे (TMC), पुणे (PMC), नवी मुंबई (NMMC) यांसह राज्यातील सर्व 29 महानगरपालिका क्षेत्रांतील मतदारांना ही सवलत मिळेल.

जाहिरात
Read Time: 2 mins

Holiday on 15 January : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नोकरदार वर्गासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना 'भरपगारी सुट्टी' जाहीर करण्यात आली आहे.

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या निवडणुकांमध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग असावा, या उद्देशाने राज्य सरकारने एक मोठा पाऊल उचलले आहे. आगामी 15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. या दिवशी सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे.

(नक्की वाचा-  BJP Rada: "पक्ष तुमच्या बापाचा आहे का?" संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक; सावे आणि कराड यांना घेराव)

कोणाला लागू असेल?

ही सुट्टी सर्व सरकारी कार्यालये, निमसरकारी संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने, बँका आणि खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना लागू असेल. लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या कलम 135 (ब) नुसार, मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार नाही.

मुंबई (BMC), ठाणे (TMC), पुणे (PMC), नवी मुंबई (NMMC) यांसह राज्यातील सर्व 29 महानगरपालिका क्षेत्रांतील मतदारांना ही सवलत मिळेल. ज्या ठिकाणी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नाही अशा ठिकाणी किमान 2 ते 3 तासांची सवलत देणे बंधनकारक असेल.

Advertisement

(नक्की वाचा- Navi Mumbai: AB फॉर्म मिळाले, सगळी तयारीही केली, मात्र अखेरच्या क्षणी ट्विस्ट; भाजपच्या 13 उमेदवारांची फसवणूक?)

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, जर एखादी खासगी कंपनी किंवा आस्थापना आपल्या कर्मचाऱ्याला मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत देण्यास नकार देत असेल, तर अशा मालकांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.