IPS Officers Transfer: राज्यातील 9 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; साताऱ्याचे SP तुषार दोशी यांचाही समावेश

Maharashtra Police Transfer News: साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली आता सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

IPS Officers transfer: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून, 9 वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने सोमवारी जारी केले. यामध्ये वादात सापडलेले साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची देखील बदली करण्यात आली आहे. यासह सांगली, कोल्हापूर आणि जळगावसह अनेक जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे.

कोण-कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या 

साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली आता सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुण्याचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे हे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील. तर, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपायुक्त (सुरक्षा) या पदावर करण्यात आली आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)

कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी निलोत्पल यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते यापूर्वी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. कोल्हापूरचे विद्यमान पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांना पदोन्नती देण्यात आली असून, त्यांच्याकडे गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलीस उप महानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

नक्की वाचा-  Bhendwal Bhakit: राज्यात पाऊस कसा असेल? राजकीय उलथापालथ होणार? भेंडवळच्या भाकितानं चिंता वाढली)

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ

जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (CID) करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे आता जळगाव जिल्ह्याची जबाबदारी सांभाळतील. गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांना त्याच जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच, पुण्याचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची बदली वाशिमच्या पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे.
 

Topics mentioned in this article