Maharashtra Rain Update :भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज, दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी पुणे जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. पुढील 3 तासांमध्ये पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम ते जोरदार पाऊस आणि ताशी 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांना या काळात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आणखी कोणत्या जिल्ह्यात कोसळणार पाऊस?
ठाणे: आज (22/09/2025) विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह (30-40 kmph) काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. उद्या (23/09/2025) विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता आहे. 24 सप्टेंबर रोजी हलका ते मध्यम पाऊस, 25 सप्टेंबर रोजी मध्यम पाऊस, तर 26 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : Navratri 2025: तुळजाभवानीचे 'माहेरघर' माहिती आहे? 1100 वर्षांपूर्वी 'या' ठिकाणी बालरूपात प्रकटल्या देवी )
मुंबई: आज (22/09/2025) विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. उद्या (23/09/2025) विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता आहे. 24 सप्टेंबर रोजी हलका ते मध्यम पाऊस, 25 सप्टेंबर रोजी मध्यम पाऊस, तर 26 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पालघर: आज (22/09/2025) विजांच्या कडकडाटासह, जोरदार वाऱ्यांसह (30-40 kmph) काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या (23/09/2025) विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता आहे.
रायगड: आज (22/09/2025) विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या (23/09/2025) विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता आहे. 24 सप्टेंबर रोजी हलका ते मध्यम पाऊस, 25 आणि 26 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.