Maharashtra Rain : बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद

ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
बदलापूर:

सकाळपासूनच ठाणे शहरात मुसळधार (Maharashtra Rain) पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने सातारा, ठाणे जिल्ह्यांना आज रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातील धरणं ओसंडून वाहत आहेत. ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नदीचं पाणी रस्त्यावर येऊन बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद झाला आहे.

बदलापूर आणि वांगणी दरम्यान चामटोली गावाजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी याच चामटोली गावाजवळ उल्हास नदीचं पाणी रेल्वे रुळावर आल्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस पुराच्या पाण्यात अडकून पडली होती. आता पुन्हा एकदा चामटोली गावात पुराचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे त्या भयावह पुराच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. 

नक्की वाचा - अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात साचलं पाणी, भगवान महादेवाला जलाभिषेक

बातमी अपडेट होत आहे.