Maharashtra Rain Alert : गणेशोत्सवाला अवघ्या एका दिवसाची प्रतीक्षा आहे. 27 ऑगस्ट, बुधवारी गणेशाची स्थापना होणार आहे. दरम्यान लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र यंदाच्या गणेशोत्सवावर पावसाचं सावट असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.दरम्यान आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला (Mumbai Rain) सुरुवात झाली आहे. उपनगरात पावसाचा फार जोर नसला तरी मुंबईत मात्र सकाळची सुरुवात धो धो पावसाने झाली.
आज 25 ऑगस्ट रोजी कोकणात यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, जळगाव, नाशिक, नंदूरबार, मराठवाड्यातील जिल्हे परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
नक्की वाचा - Mumbai News: मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर पावसामुळे किती टन जमा झाला कचरा? मनपाने दिली आकडेवारी
येत्या काही दिवसांत म्हणजे 26 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि प्रशासनानेही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये 26 ते 28 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने या भागांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. आता येणारा पाऊस त्यापेक्षा कमी तीव्रतेचा असला, तरी सध्याच्या संतृप्त जमिनीमुळे आणि नद्यांतील वाढलेल्या पाणीपातळीमुळे परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.