Maharashtra Rain Alert : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांना मोठा फटका सहन करावा लागला. या पावसात पुणे जिल्हा, वसई-विरारमध्ये नागरिकांनी दैना झाली. त्यातच गेल्या आठवडाभरापासून पावसाने ब्रेक घेतला आहे. परिणामी शेतकऱ्यांसमोरही मोठं संकट उभं राहिलं आहे. पाऊस कधी आणि किती बरसणार याबाबत हवामान विभागाकडे विचारणा केली जात आहे.
आठवडाभर कसं असेल वातावरण?
हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी या आठवड्याभराचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढील 4-5 दिवसांत पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
- बुधवारी 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज -- रायगड, ठाणे, पुणे, नगर, नाशिक, संभाजीनगर, जालना
- गुरुवारी सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिवला येलो अलर्ट
- शुक्रवारी गोंदिया आणि गडचिरोलीला येलो अलर्ट
पुणे शहरावरील पाणी कपात तूर्तास टळली
उद्या १५ जुलैपासून होणारी पाणी कपात महापौरांकडून रद्द करण्यात आली आहे. उद्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा पालिकेचा विचार होता. मात्र गेल्या काही दिवसात खडकवासला धरण साखळीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खडकवासला धरण साखळी सध्या 58% पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणे शहरातील पाणीकपात २२ जुलैपर्यंत रद्द करण्यात आला आहे. 22 जुलैपर्यंत पाणी कपात करू नका असे महापौरांनी पाणीपुरवठा विभागाला आदेश दिले आहे. 22 जुलैनंतर पावसाचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.