राज्यसभेसाठी भाजपाचे 'धक्कातंत्र'? जुन्या नेत्यांना डच्चू देत नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपा नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत असून नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवनाते यांचे नाव चर्चेत आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या उमेदवारीला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजपाने अद्याप अधिकृत यादी जाहीर केली नसली तरी, यावेळेस अनेक दिग्गज नेत्यांना विश्रांती देऊन नव्या चेहऱ्यांना संसदेत पाठवण्याचे संकेत मिळत आहेत.

भाजपाची संभाव्य यादी आणि धक्कातंत्र

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा आपल्या कोट्यातील जागांसाठी चार नवीन चेहरे देऊ शकते. नागपूरच्या माजी महापौर आणि आदिवासी महिला नेत्या मायाताई इवनाते यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. त्या कालच मुंबईत दाखल झाल्या असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा झाली आहे.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि माजी खासदार प्रितम मुंडे यांनाही राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. रामदास आठवले, भागवत कराड आणि धैर्यशील पाटील यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.

(नक्की वाचा-  Iran News: अण्वस्त्र चाचणी की भूकंप? युद्धादरम्यान इराणची जमीन हादरली; जगभरात चिंतेचं वातावरण)

महाविकास आघाडीत शरद पवारांच्या नावावर एकमत

महाविकास आघाडीमध्ये (MVA) राज्यसभेच्या एका जागेवरून सुरू असलेला पेच सुटल्याचे दिसत आहे:

राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जातील हे जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर नेत्यांनी शरद पवारांच्या नावाला हिरवा कंदील दिला आहे. आज विधानभवनात होणाऱ्या मविआच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

Advertisement

निवडणुकीचे गणित

महाराष्ट्रातील 7 जागांपैकी संख्याबळानुसार महायुती 6 जागा सहज निवडून आणू शकते, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा जाणार आहे. मात्र, भाजपाने सातवा उमेदवार उभा केल्यास निवडणूक चुरशीची होऊ शकते.

(नक्की वाचा-  T20 World Cup: ...तर सामना न खेळताच भारत विश्वचषकातून बाहेर होणार? काय आहे ICC चा नियम?)

कोणाची नावे चर्चेत?

भाजपा - मायाताई इवनाते, विनोद तावडे, प्रितम मुंडे, माधव भंडारी 
मविआ - शरद पवार 
शिंदे गट - हेमंत गोडसे 
अजित पवार गट - पार्थ पवार 
 

Advertisement
Topics mentioned in this article