जाहिरात

महाराष्ट्राला लागले आषाढीचे वेध, 'या' तारखेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान, वाचा संपूर्ण वेळापत्रक

राज्यातील वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आषाढी वारीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदाच्या पालखी सोहळ्याचे नियोजन पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले.

महाराष्ट्राला लागले आषाढीचे वेध, 'या' तारखेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान, वाचा संपूर्ण वेळापत्रक
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026 Timetable

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी

Maharashtra Palkhi 2026 : राज्यातील वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आषाढी वारीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदाच्या पालखी सोहळ्याचे नियोजन पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले. चैत्र वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी संस्थान व प्रमुख महाराज मंडळींच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.8 जुलैला या पालखीचे प्रस्थान होणार असल्याचं या बैठकीत जाहीर करण्यात आलं आहे.  

परंपरेनुसार चैत्र शुद्ध दशमीच्या दिवशी आषाढी यात्रेचे नियोजन केले जाते. त्यानुसार आज बैठक पार पडली. या बैठकीसाठी आळंदी संस्थांचे विश्वस्त तथा पालखी सोहळा प्रमुख ॲड राजेंद्र उमाप,योगी निरंजननाथ,भावार्थ देखणे , पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विश्वस्त ॲड माधवी निगडे ,ह.भ.प. वासकर महाराज यासह शेकडो महाराज मंडळी दिंडी सोहळा प्रमुख उपस्थित होते. 

यंदा पालखी सोहळा 18 दिवसांचा असणार

यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 8 जुलै रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याचे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे,यंदा प्रस्थानाच्या वेळेत बदल करण्यात आला असून सायंकाळी 4 वाजण्याऐवजी दुपारी 3 वाजता पालखी मार्गस्थ होणार आहे. हा निर्णय वारकऱ्यांच्या सोयीचा विचार करून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या वर्षी पालखी सोहळा एकूण 18 दिवसांचा असणार असून त्यामध्ये 17 मुक्कामांचा समावेश आहे. सोहळ्यात 4 गोल रिंगण आणि 3 उभे रिंगण पार पडणार आहेत. 25 जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

नक्की वाचा >>Gez Z च्या खर्चाचा खुलासा! 22 वर्षाच्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल,  बजेट पाहून सर्वच थक्क, "लाईफस्टाईल की.."

बैठकीत पालखी सोहळ्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मुक्कामाच्या ठिकाणांची माहिती तसेच तेथील पाणी,निवास,आरोग्य व सुरक्षेच्या व्यवस्थांबाबत चर्चा करण्यात आली.तसेच 29 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या परतीच्या प्रवासाचे नियोजनही निश्चित करण्यात आले आहे.या निर्णयांमुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आषाढी वारीची तयारी आता वेगाने सुरू झाली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com