जाहिरात

वारकऱ्यांसाठी पुणे सज्ज! पुण्यातील 'या' प्रमुख मार्गांवर 9 जुलैपासून No Entry, 12 जुलैपर्यंत वाहतुकीत मोठे बदल

Palkhi Traffic Diversion Pune: पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त 9 जुलै ते 12 जुलै दरम्यान वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी जारी केलेले पर्यायी मार्ग आणि बंद असलेल्या रस्त्यांची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

वारकऱ्यांसाठी पुणे सज्ज! पुण्यातील 'या' प्रमुख मार्गांवर 9 जुलैपासून No Entry, 12 जुलैपर्यंत वाहतुकीत मोठे बदल
"Palkhi Traffic Diversion Pune: पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल"
NDTV Marathi And Pune City Traffic Police X

Palkhi Traffic Diversion Pune: संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या 9 जुलै रोजी पुणे शहरात एकत्रित येत आहेत. या पालखी सोहळ्यासाठी पुणे शहरात मोठ्या संख्येने वारकरी पायी सहभागी होतात. या पालख्या दोन दिवस पुणे शहरात मुक्काम करून सोलापूर रोड, सासवड रोड मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. त्यामुळे पुणे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये तसेच वाहतूक सुरक्षित- सुरळीत आणि नियोजनबद्ध राहावी, यासाठी विशेष वाहतूक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. 

त्या अनुषंगाने वाहतूक शाखा पुणे शहराचे पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, पेट्रोल, डिजेल वाहतूक करणारी वाहने, लग्नसमारंभाची वाहने इ.) खेरीज पालखी मार्ग आणि परिसरातील वाहतुकीत आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात खालील प्रमाणे बदल केले आहेत

संत श्री. ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री. तुकाराम महाराज पालख्यांचे प्रस्थानाचा मार्ग 

11 जुलै रोजी संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी विठोबा मंदिर, भवानीपेठ, पुणे येथून रामोशीगेट चौकी चौक, भवानी माता मंदिर, मुक्ती फौज चौक, पुलगेट. मम्मादेवी चौक, सोलापूर रोडने हडपसर गाडीतळ येथून उजवीकडे वळून सरळ दिवेघाट मार्गे सासवडकडे प्रस्थान करेल.

(नक्की वाचा: Pune News: नवले ब्रिजवरून गाडी चालवण्यासाठी आता नवा नियम, तर पालखी सोहळ्यानिमित्त आरटीओ आळंदी रस्ता...)

तसेच संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिर येथून निघून अरुणा चौक, समाधान चौक, पिंपरी चौक, ए.डी. कॅम्प चौक, रामोशीगेट चौक, भवानी माता मंदिर, मुक्ती फौज चौक, पुलगेट, मम्मादेवी चौक, सोलापूर रोडने हडपसर गाडीतळ येथून कदम वाक वस्ती (लोणी काळभोर) येथे मुक्काम करून 12 जुलैला पहाटे सोलापूर रोडने यवत मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करेल.

11 जुलैला पहाटे दोन्ही पालखी पुणे शहर आयुक्तालयाचे हद्दीबाहेर जाईपर्यंत पालखी तसेच वारकरी असलेल्या मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने आवश्यकते प्रमाणे बंद करण्यात येणार असून वाहनचालकांनी पालखी मार्गावर न येता दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा

वाहतुकीसाठी बंद रस्तेबंद कालावधीवाहतुकीसाठी पर्यायी रस्ते
1. संत कबीर चौक ते बेलबाग चौकपहाटे 2 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंतसंत कबीर चौक रास्ता पेठ पॉवर हाऊस जिजामाता चौक बेलबाग चौक
2. संत कबीर चौक ते रामोशी गेट चौकपहाटे 2 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंतपॉवर हाऊस फडके हौद देवजीबाबा चौक हमजेखान चौक
3. सेव्हन लव्ह चौक ते रामोशी गेट चौकपहाटे 2 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंतसेव्हन लव्ह चौक- जेधे चौक
4. गोळीबार मैदान ते सेव्हन लव्ह चौकपहाटे 2 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंतगोळाबार मैदान-सी.डी.ए. चौक -सॅलीसबरी पार्क / लुल्ला नगर चौक-गंगाधाम चौक
5. मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदानपहाटे 2 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंतवानवडी बाजार चौक लुल्लानगर चौक गंगाधाम चौक
6. बिशप स्कुल ते सेंट मेरी / मम्मादेवी चौकपहाटे 2 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंतबिशप स्कुल पाण्याची टाकी काहुन रोड - मोरओढा ब्रीज घोरपडी
7. वानवडी बाजार ते मम्मादेवी चौकपहाटे 2 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंतवानवडी बाजार चौक शिंदे छत्री-जगताप चौक रामटेकडी ससाणेनगर
8. ट्रायलक चौक, एम.जी रोड ते रामोशी गेट चौकपहाटे 2 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंतएम.जी. रोड ते डॉ. आंबेडकर पुतळा चौक बॅनर्जी चौक
9. मोरओढा चौक ते भैरोबानाला चौकपहाटे 2 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत

1. सोलापूर बाजुला जाण्यासाठी- घोरपडी गाव-रेल्वे गेट-केशवनगर चौक मार्गे किंवा

2. कोरेगांव पार्क जंक्शन नॉर्थ मेन रोड-एबीसी फार्म चौक-केशवनगरमार्गे

10. भैरोबानाला ते मम्मादेवी चौकपहाटे 2 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत1 भैरोबानाला वानवडी बाजार चौक लुल्ला नगर चौक
2. भैरोबानाला-एम्प्रेस गार्डन रोड मोरओढा
11. जांभुळकर चौक ते फातीमा नगर चौकपहाटे 2 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंतजांभुळकर चौक-जगताप चौक
12. बी.टी. कवडे जंक्शन, काळुबाई जंक्शन, रामटेकडी जंक्शन, वैदुवाडी जंक्शन, जुना कॅनॉल रोड जंक्शन, मगरपट्टा (मुंढवा) जंक्शन, हडपसर वेस जं.पहाटे 2 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंतपालखी पास होईपर्यंत केवळ अंतर्गत रस्त्यांचा वापर सुरू ठेवण्यात येणार आहे.
13. सिरम फाटा जंक्शन ते सोलापूर रोड 15 नंबर फाटा ते सोलापूर रोडपहाटे 2 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंतपालखी व दिंड्या पास होताना तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद ठेवून प्रसंगानुरूप सोलापूर रोडला प्रवेश देण्यात येईल.
14. मंतरवाडी फाटा ते सासवड खडीमशिन चौक ते बोपदेव घाटपहाटे 2 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंतपालखी सासवड येथे मुक्कामाचे ठिकाणी पोहोचेपर्यंत कोणतेही वाहन दिवेघाटाकडे /बोपदेव घाटाकडे न सोडता खडी मशिन चौक - कात्रज मार्गे वळवण्यात येईल.

संत श्रेष्ठ श्री. तुकाराम महाराज यांची पालखी शनिवार (11 जुलै) रोजी पहाटे 2 वाजेपासून ते पालखी पुणे शहर आयुक्तालयाचे हद्दीबाहेर जाईपर्यंत वाहतूक आवश्यकते प्रमाणे बंद करण्यात येणार असून वाहनचालकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा.

हडपसर ते सोलापूर रोड पहाटे 2 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत बंद असेल.

पर्यायी वाहतूक : मगरपट्टा खराडी बायपास वाघोली मार्गे नगर रोड इच्छित स्थळी जावे

इतर निर्बंध : 

1. पालख्यांच्या मार्गावरील वारकऱ्यांची आणि भाविकांची गैरसोय होवू नये या उद्देशाने तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रस्थान मार्गाचे दोन्ही बाजूस तसेच त्यास छेदणारे इतर उप-रस्त्यांवर आतील भागात 100 मीटरपर्यंत सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास तात्पुरता प्रतिबंध करण्यात येत आहे.

2. पालख्यांचे प्रस्थान मार्गावरील पालखी पुढे जाऊन मागील रस्ता जसजसा वाहतुकीस योग्य होईल त्याप्रमाणे मागील रस्त्यावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल.

3. संत श्री. ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री. तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे पोलीस आयुक्तालयात सुरक्षित व्हावा आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेतील बदल अंमलात आणून तसेच पोलिसांनी त्या-त्यावेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

NOTE: श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंड्यांसोबत जाणाऱ्या वाहनांनी (पुण्याकडून सासवडकडे जाणा-या वाहनांनी) भैरोबानाला चौक लुल्लानगर चौक कोंढवा खडीमशीन चौक बोपदेव घाट मार्गे सासवडला जावे.

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com