IMD Red Alert News: विदर्भात सूर्य ओकतोय आग! वर्ध्यासह 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, 12 जिल्ह्यांची यादी तपासा

Heatwave Update: विदर्भात गेल्या 12 वर्षांतील सर्वात भीषण उष्णतेची लाट आली आहे. वर्धा, अमरावती आणि अकोल्यात रेड अलर्ट असून सकाळी 9 वाजेपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट असतो. वाचा सविस्तर अपडेट.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Heatwave Update: महाराष्ट्रात सूर्य आग ओकतोय, तपासा तुमच्या शहरातील तापमान"
Canva

- निलेश बंगाले, प्रतिनिधी

Heatwave Update: महाराष्ट्रात एकीकडे मान्सूनपूर्व पावसाचे संकेत मिळत असताना दुसरीकडे विदर्भात मात्र सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. विदर्भातील उष्णतेने आतापर्यंतचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. बुधवारी (20 मे) वर्धा येथे तब्बल 47.1 अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्याच्या इतिहासातील गेल्या 12 वर्षांतील ही सर्वाधिक भीषण उष्णतेची लाट ठरली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हवामान विभागाने (IMD) वर्ध्यात 'सीव्हिअर हीट वेव्ह' (अति-तीव्र उष्णतेची लाट) घोषित केली असून जिल्ह्याला 'रेड अलर्ट' जारी केला आहे.

वर्धा, अमरावती, अकोला होरपळले; गंभीर इशारा जारी (Wardha, Amravati, Akola Swelter; Severe Health Warning)

वर्धा जिल्ह्याला रेड अलर्ट | IMD Issues Red Alert For Wardha Maharashtra

गेल्या 12 वर्षांनंतर वर्ध्याचा पारा पहिल्यांदाच 47 अंशांच्या पार गेल्याने जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. वर्ध्यासोबतच अमरावती (46.4°C) आणि अकोला (45.2°C) या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.

Advertisement

उष्णतेच्या या तीव्र प्रकोपामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. या भीषण उन्हामुळे सकाळी 9 वाजल्यापासूनच विदर्भातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट असून दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदी लागू असल्यासारखे चित्र पाहायला मिळत आहे.

Photo Credit: NDTV Marathi

(नक्की वाचा: Video: मुंबईत नालेसफाईवेळी धक्कादायक प्रकार; नाल्यात तो सांगाडा पाहून BMC कर्मचारी चक्रावले! थेट क्रेनच मागवली)

20 मे रोजी कुठे किती नोंदवला गेला तापमानाचा पारा? (Temperature Across Major Cities)

विदर्भातील आणि राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमानाचे आकडे खालीलप्रमाणे आहेत:

  1. वर्धा: 47.10°C (रेड अलर्ट)
  2. नागपूर: 46.60°C (ऑरेंज अलर्ट)
  3. अमरावती: 46.40°C (रेड अलर्ट)
  4. चंद्रपूर: 46.20°C (ऑरेंज अलर्ट)
  5. अकोला: 45.20°C (रेड अलर्ट)
  6. यवतमाळ: 45.20°C (ऑरेंज अलर्ट)
  7. गोंदिया: 44.90°C
  8. वाशिम: 42.60°C
  9. जळगाव: 42.10°C
  10. छत्रपती संभाजीनगर: 41.60°C
  11. मालेगाव: 41.60°C
  12. बुलडाणा: 41.00°C
  13. बीड: 40.40°C