महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालं आहे. खातेवाटपादरम्यान तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच झाल्याची चर्चा होती. पालकमंत्री पदावरूनही तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी फॉर्म्युला ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसा असेल फॉर्म्युला?
पालमंपदावरुन होणार संभाव्य वाद लक्षात घेऊन जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाला पालकमंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याचे महायुतीतील सूत्रांकडून कळत आहे. त्यामुळे ज्या पक्षाचं जिल्ह्यात जास्त वजन असेल त्या पक्षाकडे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असा तोडगा निघाल्याचं समोर येत आहे.
आमदारांच्या प्रमाणात कुणाला पालकमंत्री द्यायचं या सोप्या गोष्टी नाहीत. संघटना जे सांगेल ते करू. पालकमंत्री पदाबाबत कुठलाही फार्म्युला ठरला नाही किंवा ठरला असेल तर मला माहित नाही. पालकमंत्री त्या जिल्ह्यातील आमदारांच्या संख्येवर ठरत नाही तर अनुभवावरून ठरतो, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Pune Accident: पुण्यात हिट अँड रन! भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं, 3 जण ठार)
अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर दावे-प्रतिदावे केले जात आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. सातारा जिल्हातून शिवसेनेचे शंभूराज देसाई हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.
नक्की वाचा - Guardian Minister : खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय शिरसाटांनी आधीच केलं जाहीर
संजय शिरसाट यांनी तर एक पाऊल पुढे जात छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार असा दावा केला आहे. बीड जिल्ह्यातही पालकमंत्रिपद पंकजा मुंडेंकडे जाणार की धनंजय मुंडेंकडे याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे.