कल्याण-शिळफाटा मार्गावरील 11 ते 31 ऑगस्टदरम्यान वाहतुकीत मोठे बदल; कोणते मार्ग बंद आणि पर्यायी मार्ग?

Kalyan News : एमएमआरडीएच्या (MMRDA) मेट्रो 12 (कल्याण-तळोजा) प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे आणि सिमेंटचे गर्डर बसवण्याच्या कामामुळे हे बदल करण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

ठाणे शहरातील कोळसेवाडी वाहतूक उपविभागाने कल्याण-शिळफाटा मार्गावर मोठ्या वाहतूक बदलांची घोषणा केली आहे. एमएमआरडीएच्या (MMRDA) मेट्रो 12 (कल्याण-तळोजा) प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे आणि सिमेंटचे गर्डर बसवण्याच्या कामामुळे हे बदल करण्यात आले आहेत. हे बदल 11 ऑगस्ट 2025 पासून ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत रात्री 11:45 ते पहाटे 5:00 वाजेपर्यंत लागू असणार आहेत. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हे बदल दोन टप्प्यांत लागू होतील.

वाहतुकीतील प्रमुख बदल आणि पर्यायी मार्ग

पहिला टप्पा 11 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2025

प्रवेश बंद : या काळात कल्याण शिळरोडवरून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मानपाडा चौकातून प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग : या वाहनांना मानपाडा चौक येथून सर्व्हिस रोडने पुढे जाऊन सोनारपाडा चौक येथून पुन्हा मुख्य रस्त्यावर यावे लागेल.

(नक्की वाचा-  Crime News : भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोघांची निर्घृण हत्या, भिवंडीतील घटनेने खळबळ)

दुसरा टप्पा : 21 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025

प्रवेश बंद : कल्याण शिळरोडवरून शिळफाट्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी सुयोग रीजन्सी अनंतम चौक येथे प्रवेश बंद असेल.

पर्यायी मार्ग : ही वाहने पीलर 110 वरून उजवीकडे वळण घेऊन कल्याणकडे येणाऱ्या वाहिनीवरून पीलर 128 समोरून डावीकडे वळण घेऊन पुढे जातील.

प्रवेश बंद : कल्याण शिळरोडवरून कल्याणकडे येणाऱ्या सर्व वाहनांना डी.एन.एस. चौकात प्रवेश बंद असेल.

(नक्की वाचा-  Konkan News : गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणवासियांसाठी मोठी बातमी; महत्त्वाचा थांबा मंजूर)

पर्यायी मार्ग : ही वाहने डी.एन.एस. चौक पीलर 144 वरून सर्व्हिस रोडने जाऊन पुढे सुयोग हॉटेल अनंतम चौक येथून पुन्हा कल्याण रोडवरून इच्छित स्थळी जातील.

हे बदल रात्रीच्या वेळेत लागू असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही, अशी अपेक्षा आहे. मात्र, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना ही अधिसूचना लागू होणार नाही.

Advertisement

Topics mentioned in this article