बारामती (Baramati Election) तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची (Malegaon Sugar Factory Election) मतमोजणी सुरू आहे. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून नीलकंठेश्वर पॅनलचे रतन कुमार भोसले विजय झाले आहेत. जवळपास 1487 मतांनी रतनकुमार भोसले यांचा विजय झाला आहे. तावरे गटाच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलचे बापूराव आप्पाजी गायकवाड गायकवाड हे पराभूत झाले आहेत.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून रतनकुमार साहेबराव भोसले यांना 8670 मते मिळाली, तावरे गटाचे सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार बापूराव आप्पा गायकवाड यांना 7183 मते मिळाली. यात 1487 मते रतन कुमार भोसले यांना जास्त मिळाली. अनुसूचित जाती जमाती मतदार संघात एकूण 17390 मतदान झालं होतं यात 673 मते फेटाळण्यात आली तर 16717 मते ग्राह्य धरण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलचा तिसरा विजय झाला आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून नितीन शेंडे 8494 मतं मिळाली आहेत. 1153 मतानी नितीन शेंडे विजयी झाले असून सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे पराभूत झाले आहेत. नाळे यांना 7341 एवढी मतं मिळाली आहेत.
नक्की वाचा - Malegaon Sugar Factory Election Live Updates: माळेगाव निवडणूक निकाल: अजित पवार यांच्या पॅनेलचे 16 उमेदवार आघाडीवर
अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला...
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ((Malegaon Sakhar karkhana Election)) निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. 24 जून सकाळी नऊ वाजता सुरु झालेली मतमोजणी दुसऱ्या दिवशीही सुरु असून आज त्याचा निकाल स्पष्ट होणार आहे. मध्यरात्री तीन वेळा मतमोजणी थांबल्यानंतर आता पहाटे पाच वाजता पुन्हा मतमोजणी सुरु झाली आहे. या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून चंद्रराव तावरे यांच्या शेतकरी पॅनलने त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.