KDMC News: नव्या चेहऱ्यांना संधी नाही, वादग्रस्त राहिलेल्या या नेत्याची स्थायी समिती सभापती पदावर पुन्हा वर्णी

शेट्टी हे जुने आणि अनुभवी नगरसेवक आहेत. वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहतात. नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, अशी चर्चा होती. मात्र शिंदे गटाने शेट्टी यांनाच सभापती दिले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
KDMC Chairman of the Standing Committee
मुंबई:

KDMC latest News : कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समिती,शिक्षण समिती आणि महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी उनमेदवारी अर्ज दाखल करणयात आले.दोन सभपती पद शिवसेना शिंदे गटाकडे तर एक सभापती पद भाजपकडे आले आहे. स्थायी समिती सभापती पदासाठी मल्लेश शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शेट्टी हे जुने आणि अनुभवी नगरसेवक आहेत. वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहतात. नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, अशी चर्चा होती. मात्र शिंदे गटाने शेट्टी यांनाच सभापती दिले आहे.

कल्याण डेांबिवली महापालिका स्थायी समिती सभापती,महिला बाल कल्याण समिती आणि शिक्षण समिती सभापती उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपने शिक्षण समितीसाठी नवा चेहरा दिला आहे.प्रथमच निवडून आलेले अभिजीत थरवळ यांना शिक्षण समिती सभापती पद दिले आहे.त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

Advertisement

नक्की वाचा >> उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांसाठी कोकणाला दुय्यम वागणूक? रेल्वेमंत्र्यांना दिलेलं 'ते' पत्र होतंय व्हायरल

महासभेत मल्लेश शेट्टी नेहमीच राहिले चर्चेत, कारण..

आत्ता केवळ औपचारिकता राहिली आहे. शिवसेनेच्या जुन्या नगरसेवका सारीका जाधव यांना महिला बाल कल्याण समिती सभापती दिले आहे.  स्थायी समिती सभापती पद मल्लेश शेट्टी यांना देण्यात आले.शेट्टी हे दोन वेळा स्थायी समिती सभापती राहिले आहेत. महासभेत रवी पाटील यांच्यासोबत राडा,स्थायी समिती सभापती असताना बजेट सादर करण्यापूर्वी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात एका कार्यकर्त्यावर हल्ला,महासभेत केलेल्या एखाद्या टिप्पणीमुळे ते चर्चेत राहतात.

नक्की वाचा >> Crime: छत्रपती संभाजी नगरमध्ये खळबळ! मृदंगाचार्य लाघाने महाराजांच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीनं जीवन संपवलं

दरम्यान, केडीएमसी तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच राहणार आहेत. तर कल्याण पूर्व विभागाला महत्त्वाची दोन पदे मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महापौर कल्याण पश्चिमेचा तर दोन पदे कल्याण पूर्व विभागाला देण्यात आली आहेत.डोंबिवलीतील एकाही नगरसेवकाला संधी देण्यात आलेली नाही.