नाशिकमध्ये अघोरी कृत्य करणाऱ्या एकाला अटक, प्लास्टिकच्या मानवी कवट्याही आढळल्या

पोलिसांना याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. महाराष्ट्र जादूटोणा कायदा 2003 च्या कलम 3 अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

किशोर बेलसरे, नाशिक

नाशिकच्या पंचवटीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंटवटी परिसरातून प्लास्टिकच्या मानवी कवट्यासह एका इसमाला नाशिक पोलिसांनी अटक केला आहे. आरोपीविरोधात जादूटोणा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. 

(नक्की वाचा- पत्रक, स्कॅनर, बायबल अन् पाच महिला; पुण्यातील 'त्या' कुटुंबासोबत नेमकं काय घडलं?) 

पोलिसांना सविस्तर दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पंचवटी हद्दीत एंरडवाडीतील कालिकामात मंदिर परिसरात प्लास्टिकच्या मानवी कवट्या आढळून आल्या होत्या. कालिकामाता मंदिरात एक व्यक्ती अघोरी कृत्य करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. 

(नक्की वाचा- सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, Youtube व्हिडीओ आला समोर)

पोलिसांना याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. महाराष्ट्र जादूटोणा कायदा 2003 च्या कलम 3 अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Topics mentioned in this article