"भुजबळ मराठा-धनगरांमध्ये दंगल घडवणार"; मनोज जरांगेचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil : आमच्या मागण्या देखील पूर्ण होणार आहेत. एकही नोंद रद्द होणार नाही. अन्यथा याचे परिणाम सरकराला भोगावे लागणार. असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Advertisement
Read Time: 3 mins

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मागील 10 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण आज स्थगित केलं आहे. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, "मराठा समाजाला 'सरसकट ओबीसी' अशी मागणी मान्य करता येणार नाही. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली. भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगे यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे. भुजबळांचं ऐकून मराठ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी आता सरकारचे लोकच प्रयत्न करत आहेत. यासाठी सरकारचेच लोक आता आंदोलन करत आहेत. मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचे काम छगन भुजबळांनी करू नये. विनाकारण मराठ्यांची नाराजी धनगर बांधवावर ओढून घेऊ लागले आहेत. मराठा आणि धनगर बांधवांमध्ये 100 टक्के दंगल घडवणार आहे, हे त्यांचं कामच आहे, अशी गंभीर टीका जरांगे यांनी भुजबळांवर केली. 

(नक्की वाचा- 'कुछ लोक अपनी औकात भूल गए है...'OBC आरक्षणावर भुजबळांचा घणाघात)

...तर आमचं आंदोलन मंडल कमिशन रद्द करण्यासाठी असेल

आता सापडलेल्या नोंदी रद्द करा म्हणत आहेत. नोंदी रद्द करा म्हणता, नाहीतर रस्त्यावर उतरू असा इशाला देतात. छगन भुजबळ हे तुम्ही चांगले वागत नाहीत. छगन भुजबळ कुठे हे पाप फेडणार. या सर्वांनी मला मारून टाकायचा प्लॅन केला असेल. मी काही कमी नाही, मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाही. देवेंद्र फडणवीसांनी चांगले काम करून दाखवावे. आमच्या मागण्या पूर्ण करा, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. नोंदी रद्द झाल्यास आमचे आंदोलन हे मंडल कमिशन रद्द करण्यासाठी असेल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

( नक्की वाचा : लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित, सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये केली घोषणा )

जरांगेंचा सरकारला इशारा

आमची नोंद असून देखील आरक्षण देऊ नका असं म्हणतात, तुमची काय नियत आहे. आता मराठे देखील रस्त्यावर उतरणार आहे. आता खेटायचंच असेल तर त्याला नाईलाज आहे. आमच्या मागण्या देखील पूर्ण होणार आहेत. एकही नोंद रद्द होणार नाही. अन्यथा याचे परिणाम सरकराला भोगावे लागणार. असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Advertisement

सरकारमधील लोक आंदोलन करू लागले आहेत. सरकारचे लोक ठरवून आंदोलन करत आहेत. आंदोलन देणारे सत्ताधारी आणि ओबीसी नेते आहेत. तेच आंदोलन करत असून सगळा खेळ मॅनेज आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू किंवा नाही लागू हे आम्हाला माहीत नाही. आमच्या हक्काचे गॅझेट आणि नोंदी आहेत. आमच्याकडे अर्धा तास आधी पुरावे आले आहेत. लाखो नोंदी आमच्या सरकारने दाबून ठेवल्या. औंढ येथील आणि ब्रिटिश कालीन पुरावे घेत नाही. छगन भुजबळांनी हे केलं उघड पडले आहे, चोरी उघडी पडली, असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

Topics mentioned in this article