Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या मोर्चाचा आजचा मार्ग कसा असेल? मुक्काम कुठे असणार?

मनोज जरांगे आज उशीरा दुपारी जुन्नरमधून मुंबईच्या दिशेने पुढे जातील अशी शक्यता निर्माण झालेली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी अनेक मराठा आंदोलक हे वाट पाहत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज जरांगे यांच्या मोर्चाचा ताफा काल शिवनेरीवर मुक्कामी होता. आज दुसऱ्या दिवशी सकाळी शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्म स्थळाचे दर्शन घेऊन जुन्नरमध्ये मुख्य सभेच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर पुढे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. आज उशीरा दुपारी जुन्नरमधून हे आंदोलक मुंबईच्या दिशेने पुढे जातील अशी शक्यता निर्माण झालेली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी अनेक मराठा आंदोलक हे वाट पाहत आहे.

मोर्चाच्या दुसऱ्या दिवसाचा मार्ग कसा असेल?

28 ऑगस्ट रोजी सकाळी किल्ले शिवनेरीचे दर्शन घेऊन मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होईल. हा मोर्चा चाकण, तळेगाव आणि लोणावळा या महत्त्वाच्या ठिकाणांवरून पुढे सरकत थेट वाशी मार्गे मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचेल. या दिवशी मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा-  Manoj Jarange Patil : 'जरांगे फॅक्टर' पुन्हा चर्चेत! कोण करतं नियोजन, पडद्यामागील 8 कारभारी माहिती आहेत?)

मुंबईत आंदोलन 29 ऑगस्ट

29 ऑगस्ट रोजी सकाळी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत आलेले आंदोलक आझाद मैदानावर उपस्थित राहतील. येथे मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडे आपली मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडण्यात येईल. हा मोर्चा शांततापूर्ण मार्गाने व्हावा, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती तयारी केली आहे. मात्र, मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची शक्यता असल्याने मुंबई शहरावर या मोर्चाचा परिणाम दिसून येईल.

(नक्की वाचा : Maratha Morcha traffic change: पुणेकरांनो लक्ष द्या! मराठा मोर्चासाठी वाहतुकीत मोठा बदल, हे आहेत पर्यायी मार्ग)
 

मनोज जरांगेंचा ताफा मुंबईच्या दिशेने निघण्याआधीच शासनाकडून त्यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न होऊ शकतात. जरांगेंच्या आंदोलनाला एका दिवसाची परवानगी मिळाली असून आझाद मैदानात ते 29 तारखेला 5000 लोकांसह सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत आंदोलन करु शकतात. मात्र, जरांगेंना ही अट मान्य नसून एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईत मराठे आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शासनाकडून आज पावलं उचलले जाण्याची शक्यता आहे.

Advertisement

Topics mentioned in this article