जाहिरात

Maratha Morcha traffic change: पुणेकरांनो लक्ष द्या! मराठा मोर्चासाठी वाहतुकीत मोठा बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Maratha Morcha traffic change: सुरळीत वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

Maratha Morcha traffic change: पुणेकरांनो लक्ष द्या! मराठा मोर्चासाठी वाहतुकीत मोठा बदल, हे आहेत पर्यायी मार्ग
Maratha Morcha traffic change: पुणेकरांनो घरातून बाहेर पडण्यापूर्वी हे बदल वाचा
मुंबई:

Maratha Morcha traffic change: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 27 ते 29 ऑगस्टदरम्यान पुणे जिल्ह्यातून मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा, 1988 नुसार वाहतुकीमध्ये तात्पुरते बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. सुरळीत वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

मोर्चाचा मार्ग आणि कालावधी

हा मोर्चा 27 ऑगस्ट रोजी अहमदनगरहून आळेफाटा, ओतूर आणि बनकर फाटा मार्गे किल्ले शिवनेरी येथे पोहोचणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी किल्ले शिवनेरीवरून नारायणगाव, मंचर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा मार्गे मुंबईकडे रवाना होणार आहे. त्यामुळे 27 ऑगस्ट रात्री 10 वाजल्यापासून 29 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील.

( नक्की वाचा :  मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग आता काही तासांत! प्रवास, वेळेसह तिकिटाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर )
 

काय आहेत पर्यायी मार्ग?

नगर-कल्याण मार्गावरील वाहतूक: 14 नंबर जांबुत फाटा येथून अहमदनगरकडे जाणारी वाहने बोर, बेल्हे, अळकुटी, पारनेर मार्गे अहमदनगरला जातील.
नारायणगावकडून जुन्नरकडे जाणारी वाहतूक: ही वाहतूक ओझर फाटा, कारखाना फाटा आणि शिरोली बुद्रुक मार्गे वळवण्यात आली आहे.
नारायणगावकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक: पुणे-नाशिक महामार्ग क्र. 50 व बायपास महामार्ग क्र. 60 वरील नारायणगावकडून चाकणकडे जाणारी वाहने नारायणगाव बायपासमार्गे कारफाटा, मंचर पोलिस स्टेशन, नागापूर, रोडेवाडीफाटा ते लोणी-पाबळ मार्गे शिक्रापूर-नगर रोडवरून पुण्याकडे जातील.
खेड शहराकडून पुण्याकडे जाणारी वाहने: ही वाहने पाबळ मार्गे वळवण्यात आली आहेत.

( नक्की वाचा : Thane Metro ठाणे मेट्रोची प्रतीक्षा संपली! 'या' 10 स्टेशनवरून धावणार मेट्रो, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन कोणतं? )
 

पुणे-मुंबई महामार्गांवरील बदल

जुना पुणे-मुंबई महामार्ग (क्र. 48): या महामार्गावरील वाहतूक नव्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Expressway) वळवण्यात आली आहे.
चाकण-देहुरोडकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक: ही वाहने वडगाव फाट्यावरून द्रुतगती मार्गाने उर्से टोलनाकामार्गे मुंबईकडे जातील.
मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक: खंडाळा-वलवण एक्झिटवरून लोणावळा शहरात किंवा जुन्या महामार्गावर न वळता ती थेट पुण्याकडे जाईल.
मुंबईकडे जाणारी वाहने: वलवण एक्झिटवरून लोणावळा शहरात न जाता थेट मुंबईकडे जातील.
लोणावळा शहरातील वाहतूक: पुणे व मुंबईकडे जाणारी वाहने जुन्या महामार्गाचा वापर न करता वलवण पुलावरून द्रुतगती मार्गाने प्रवास करतील.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com