Palghar News: प्रेमी युगुलाची गळफास लावून आत्महत्या, विक्रमगडमधील घटनेने खळबळ

Palghar News: नरेशचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्याला दोन मुले देखील आहेत. सारिका महाला ही अविवाहित तरुणी होती. या दोघांनीही गावाजवळील एका शेतात एकाच झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आपले जीवन संपवले.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सारशी गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावात राहणाऱ्या एका विवाहित पुरुषाने आणि त्याच्या प्रेयसीनेएकत्र आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सारशी गावामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

आत्महत्या केलेल्या पुरुषाची ओळख नरेश लहू नडगे (वय 39) आणि तरुणीची ओळख सारिका शंकर महाला(वय 25) अशी झाली आहे. नरेश नडगे हे सारशी ग्रामपंचायतीचे सदस्य होते. म्हणजेच ते सार्वजनिक जीवनात कार्यरत होते.

नरेशचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्याला दोन मुले देखील आहेत. सारिका महाला ही अविवाहित तरुणी होती. या दोघांनीही गावाजवळील एका शेतात एकाच झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आपले जीवन संपवले.

प्रेमसंबंध आणि विरोध

मिळालेल्या माहितीनुसार, नरेश नडगे आणि सारिका महाला हे दोघेही एकाच गावात राहत होते आणि त्यांच्यात लहानपणापासूनच प्रेमसंबंध होते, असे सांगण्यात येत आहे. नरेश विवाहित असल्याने, तसेच या दोघांच्या प्रेमसंबंधांना दोन्ही बाजूंच्या कुटुंबाकडून तीव्र विरोध होता. नरेशचे लग्न झालेले असल्याने आणि त्याला दोन मुले असल्यामुळे हा विरोध अधिकच तीव्र झाला होता.

Advertisement

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

या प्रेमसंबंधांना विरोध असल्यानेच दोघांनी शेतात जाऊन हे टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपवली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, पत्नीचा विरोध आणि कुटुंबियांच्या विरोधाला उत्तर म्हणून त्यांनी हे केले की यामागे अन्य काही कारण आहे. विक्रमगड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Topics mentioned in this article