मसाला डोसा द्यायला उशिर झाला? ग्राहकानं राडा केला, व्हिडीओ व्हायरल

एका हातगाडी लावणाऱ्या व्यक्तिला मसाला डोसा देताना उशिर झाला त्यामुळे संतप्त ग्राहकाने हा राडा केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

कल्याणमध्ये सोशल मिडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.ज्या व्हिडिओत हातगाडीवर डोसा विकणाऱ्यास   शिविगाळ केली जात आहे. वेळेवर डोसा दिला नाही म्हणून राग आलेल्या ग्राहकाने हे कृत्य केले आहे. त्याला राग इतका आला की त्याने गाडीच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीवर लाथ मारताना व्हिडीओत दिसत आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ टाकत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एका हातगाडी लावणाऱ्या व्यक्तिला मसाला डोसा देताना उशिर झाला त्यामुळे संतप्त ग्राहकाने हा राडा केला आहे. हे कितपत योग्य आहे अशा व्यक्तिच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एक व्यक्ती हातगाडीवर मसाला डोसा करीत आहे. दुसरा व्यक्ती त्याला दमबाजी करुन शिव्या देतोय. तू कोणाच्या नावावर माज करतो. त्याला पण बघतो, इतके लक्षात ठेव. हा व्यक्ती मसाला डोसा विकणाऱ्या व्यक्तिला मारायला जातो. काही महिला मध्यस्थी करण्यासाठी सरसावत आहेत. एक तरुण पूढे येतो. तो त्या संतप्त ग्राहकाला समजावण्याचा प्रयत्न करतो. मात्र संतापलेला ग्राहक डोसा तयार करणाऱ्या मारायला जातो. पण त्याला न मारतो तो हातगाडीच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीला लाथ मारतो. यावेळी तिथे दुसरेही ग्राहक होते. त्यांना मात्र या कृतीचा त्रास झाला. 

ट्रेंडिंग बातमी - महायुतीचा विधानसभा निवडणुकीसाठी मेगा प्लॅन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून ठरवली योजना

हा सर्व प्रकार एका व्यक्तीने कॅमेरात कैद केला. या व्हिडिओची पडताळणी केली असता हा व्हिडिओ कल्याण पश्चिमेतील गांधी चौकातील आहे. हातगाडी लावणाऱ्या व्यक्तीचे नाव कृष्णा गौड आहे. कृष्णा गेल्या अनेक वर्षापासून गांधी चौकात गाडी लावतात. त्यांचा डोसा गाडीवर ग्राहकांची गर्दी असते. लोक डोसा पार्सल घेण्यासाठीही येतात. मंगळवारी एक ग्राहक त्याच्या पत्नीसोबत मसाला डोसा घेण्यासाठी आला. इतर ग्राहकांच्या ऑर्डर असल्याने त्याला डोसा देण्यास विलंब झाला. त्यावरुन ग्राहक संतापला. 

ट्रेंडिंग बातमी -  शेख हसीनांनी बांगलादेश सोडला, भारतात आल्या, सोबत किती संपत्ती आणली?

संतापाच्याभरात त्याने हा प्रकार केला. या बाबत कृष्णाचे नातेवाईक  यांनी सांगितले की, मसाला द्यायला विलंब झाल्याने ग्राहकांनी गोंधळ घातला एवढी माहिती दिली आहे. घाबरलेल्या नातेवाईकाने या प्रकरणावर जास्त बोलणे टाळणे आहे. या प्रकरणात कोणतीही तक्रार बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल झालेली नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संबंधित व्यक्तीला पोलिसांनी शोधून काढले पाहिजे. एका हातगाडी चालविणाऱ्या व्यक्तीला ही वागणूक देणाऱ्यावर कारवाई कारवाई केली पाहिजे अशी मागणी सोशल मिडियाद्वारे केली जात आहे.

Advertisement

Topics mentioned in this article