Mega Block News: उपनगरीय रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी (18 ऑगस्ट 2024) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रविवारी जर बाहेर पडणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. मध्य रेल्वेवर सकाळी 10.50 ते 3.20 पर्यंत मेगाब्लॉक असेल. तर हर्बर मार्गावर सव्वा अकरा ते सव्वा चार वाजे पर्यंत मेगाब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग ठाणे ते दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर रविवारी मेगाब्लॉक असेल. सकाळी 10.50 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सकाळी लांब पल्ल्याच्या जलद लोकल धीम्या मार्गाने वळवण्यात येतील. त्याचबरोबर काही लोकलसेवा पूर्णतः बंद राहतील.
ट्रेंडिंग बातमी - '...तर लाडक्या बहिणीला दीड ऐवजी 3 हजार रुपये देऊ'
रविवारी हार्बर मार्गावर ब्लॉक
हार्बर मार्गावरील सीएसएमटी,चुनाभट्टी, वांद्रेदरम्यान रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते कुर्लादरम्यान विशेष लोकल धावतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर ही ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रूझ गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉकची वेळ आहे. या कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर हार्बर मार्गावरील अंधेरी, बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील. असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.