मेगाहाल होणार, आज सीएसएमटी स्थानकातून सुटणार नाही एकही लोकल

शनिवारी रात्री 12:30 वाजल्यापासून मेगाब्लॉक सुरु होणार आहे. तो रविवारी दुपारी 12:30 वाजता समाप्त होणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान CSMT स्थानाकावरून एकही गाडी सुटणार नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनवरील 10-11 प्लॅटफॉर्म्सच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी सध्या मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.  36 तासांचा हा ब्लॉक घेण्यात येत आहे. ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म्सचे रुंदीकरण करण्यासाठी 63 तासांचा ब्लॉक असेल. गुरुवारी (30 मे 2024) रात्रीपासून ते रविवारी (2 जून 2024) दुपारपर्यंत ठाण्यातील ब्लॉक सुरू असेल. शुक्रवारी (31 मे 2024) रात्रीपासून ते रविवारी ( 2 जून 2024) दुपारपर्यंत सीएसएमटी येथे ब्लॉक असेल. या कालावधीत 74 रेल्वे गाड्या रद्द होणार असून 122 रेल्वेगाड्या अंशत: रद्द होणार आहेत. यामुळे मध्य रेल्वेवरील सुमारे 33 लाख प्रवाशांचे हाल होणार आहे. दरम्यान आज काही प्रवाशी सीएसएमटी स्थानकाकडे लोकल पकडण्यासाठी गेले होतो. मात्र तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना स्थानकात येण्यास मनाई केली. लोकल बंद असल्याच्या सुचना या आधीच रेल्वे विभागाने दिल्या असतानाही अनेक प्रवाशी सीएसएमटी स्थानकात पोहोचत आहेत.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर 10 आणि 11 वर फलाट वाढवण्याचं काम सुरु आहे. त्यासाठी हा 36 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 12:30 वाजल्यापासून मेगाब्लॉक सुरु होणार आहे. तो रविवारी दुपारी 12:30 वाजता समाप्त होणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान CSMT स्थानाकावरून एकही गाडी सुटणार नाही. CSMT ते वडाळा आणि CSMT ते भायखळा या मार्गावर गाड्या बंद असणार आहे. दादर ते भायखळा गाड्या सुरु राहतील. पण त्याचे प्रमाण कमी असेल. शिवाय त्या धिम्या गतीने धावतील. त्यामुळे  शनिवारी दादर स्थानकातून बहुतेक गाड्या सुटणार आहेत. शिवाय त्यांचे शेवटचे स्टेशनही दादर हेच असेल. 

Advertisement

हेही वाचा - प्रवाशांनो हे लक्षात ठेवा! मध्य रेल्वेवर 3 दिवसांचा मेगाब्लॉक, लोकलच्या 930 फेऱ्या रद्द

सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्रमांक 10-11वर सध्या 16 डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबत असून या प्लॅटफॉर्मवर 24 डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबवण्यासाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार केला जात आहे. हे काम पूर्ण मध्य रेल्वेकडून करण्यासाठी शुक्रवार(31 मे), शनिवार (1 जून) आणि रविवारी (2 जून) मेगाब्लॉक घेतला आहे. 

Advertisement

हेही वाचा - जम्बो ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल, कर्जत-कसारा-पनवेलकरांनो अशी गाठा मुंबई

Advertisement