Central Railway Mega Block: ठाणे स्थानकातील 63 तासांचा ब्लॉक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील 36 तासांच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल होत आहेत. ठाणे स्थानकातील ब्लॉकमुळे कल्याण-कसारा-कर्जत मार्गावरील लोकल प्रवाशांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचा प्रवास धीम्या गतीने होणार आहे. शुक्रवारी (31 मे 2024) मध्यरात्री साडेबारानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा आणि वडाळा रोडदरम्यान लोकल वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे शनिवारी (1 जून 2024) कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना भायखळा आणि पनवेल-गोरेगाववरील प्रवाशांना वडाळा रोडपर्यंतच प्रवास करता येणार आहे. दरम्यान शनिवारी धावणाऱ्या रेल्वे फेऱ्या रविवार (2 जून 2024) वेळापत्रकानुसार धावणार असल्याने फेऱ्यांची संख्या कमी असणार आहे.
शुक्रवारी (31 मे) अशी गाठा मुंबई
- कर्जत-कसारामार्गे येणाऱ्या प्रवाशांना दादर स्थानकातून पश्चिम रेल्वेमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येता येईल
- पनवेलहून येणाऱ्या प्रवाशांना वडाळा रोडपर्यंत लोकलने त्यानंतर रस्तेमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठता येईल
- विरार-डहाणू रोडवरून येणाऱ्या प्रवाशांना चर्चगेटमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत पोहोचता येईल
(नक्की वाचा: प्रवाशांनो हे लक्षात ठेवा! मध्य रेल्वेवर 3 दिवसांचा मेगाब्लॉक, लोकलच्या 930 फेऱ्या रद्द)
एसटी आणि टीएमटीच्या प्रत्येकी 50 गाड्या
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने मुंबईतील कुर्ला नेहरूनगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाणेदरम्यान 50 जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आगारातून 26 आणि ठाणे आगारातून 24 गाड्या चालवल्या जाणार आहेत. प्रवासी मागणी लक्षात घेता यामध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल. प्रवासी मार्गदर्शनासाठी मुंबई आणि ठाणे आगारात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात येतील, असे एसटीच्या वाहतूक विभागाचे उपमहाव्यवस्थापक चेतन हसबनीस यांनी सांगितले. ठाणे ते मुलुंड आणि ठाणे ते दिवादरम्यान ठाणे महापालिकेच्या टीएमटीच्या 50 जादा बसगाड्या धावणार आहेत.
(नक्की वाचा: मुंबई कोस्टल रोडसाठी ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार? काय आहे कारण)
शुक्रवारपासून (31 मे 2024) ठाण्यात ब्लॉक (डाऊन जलद)
स्थानक - कळवा ते ठाणे
मार्ग - अप-डाउन धीमा आणि अप जलद
वेळ - 31 मे मध्यरात्री 12.30 वाजेपासून ते 2 जून दुपारी 3.30 वाजेपर्यंत
परिणाम - डाउन जलद मार्गावरील लोकल/मेल/एक्स्प्रेस पर्यायी मार्गावरून सीएसएमटीपर्यंत चालवण्यात येणार आहेत. शनिवारी (1 जून) 161 लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या उशीराने धावणार आहेत.
63 hrs Special Block at Thane (DN Fast line) began at 00.30 am on 30/31.05.2024.
— Central Railway (@Central_Railway) May 30, 2024
The work for widening of platform no. 5/6 of Thane Station started with the dismantling of existing tracks.
The Block and work started post midnight will finish on 2nd June 2024 afternoon.
The… pic.twitter.com/CrnIIN3woe
ठाणे स्थानकात होणारी कामे
- प्लॅटफॉर्म क्रमांक पाचचे रुंदीकरण
- पहिल्या 12-15 तासांत सुमारे 900 मीटर अंतराचे रेल्वे रूळ सरकवणे
- त्यानंतरच्या 26 तासांत 785 प्री-कास्ट बॉक्स प्लॅटफॉर्मलगत रचणे
- बॉक्स रचण्यासाठी रणगाडे वाहून नेणाऱ्या (मिलिटरी बोगी वेल टाइप-एमबीडब्ल्यूटी) मालगाडीचा वापर
- लष्करी रेल्वे मालगाडीवर पोकलेन, क्रेन आणि प्री-कास्ट बॉक्स ठेवणे
- प्रत्येक बॉक्सचे वजन दोन टन
- बॉक्स ठेवल्यानंतर प्लॅटफॉर्म आणि बॉक्स यांची जोडणी करणे
- प्लॅटफॉर्मसाठी काँक्रिटीकरण करून त्यावर लाद्या बसवणे
(नक्की वाचा: 'बँगलोर रोज' कांद्याला 40 टक्के निर्यात शुल्क माफ, महाराष्ट्रातील शेतकरी भडकले)
शुक्रवारी (31 मे) मध्यरात्रीनंतर केवळ भायखळा, वडाळा रोडपर्यंत लोकल
- स्थानक - सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड
- मार्ग - अप-डाउन जलद, अप-डाउन धीम्या, यार्ड मार्गिका
- वेळ - 1 जून मध्यरात्री 12.30 वाजेपासून ते 2 जून दुपारी 3.30 वाजेपर्यंत
- परिणाम - सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल फेऱ्या रद्द
63 hrs Special Block at Thane (DN Fast line) began at 00.30 hrs on 30/31.05.2024.
— Central Railway (@Central_Railway) May 30, 2024
The work for widening of platform no. 5/6 of Thane Station started with the dismantling of existing tracks and removal of OHE wires & equipments.#CentralRailway #SpecialBlock #RailwayUpdates pic.twitter.com/Nz1ugJi4CG
Central Railway Mega Block | मुंबईत महामेगाब्लॉक; ठाण्याला 63 तासांचा, CSMT जवळ 36 तासांचा ब्लॉक
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world