Nagpur News : नागपूर महाराजबाग प्राणीसंग्रहालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरातील महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील वाघाच्या पिंजऱ्यात एक व्यक्ती शिरल्याची माहिती आहे. त्यावेळी पिंजऱ्यात दोन वाघ होते. त्यातही ही व्यक्ती कशी शिरली याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे.
नागपूर महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील वाघाच्या पिंजऱ्यात दोन वाघ असताना ही व्यक्ती शिरली. सुदैवाने त्या व्यक्तीस सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या वाघाच्या पिंजऱ्यात शिरणारी व्यक्ती मानसिक आजारी असल्याचं सांगितलं जात आहे. सीताबर्डी पोलिसांनी त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढलं आणि ताब्यात घेतलं.
नक्की वाचा - Nagpur News: 'FIR हिंदीतून आणा नंतर अपघात विमा क्लेम करा' मनसैनिक धडकले पण घडलं भलतच
सुमारे अर्धा तास ती व्यक्ती वाघाच्या पिंजऱ्याकडे जाणाऱ्या पॅसेजमध्ये उभी होती. वाघाच्या 18 फूट उंच पिंजऱ्यात ती व्यक्ती कशी शिरली याची चौकशी केली जात आहे. सुदैवाने वाघ त्यावेळी आतील नाईट शेल्टर असलेल्या पिंजऱ्यात असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेनंतर वाघांच्या पिंजऱ्यासाठी चौकीदार, बंदूकधारी गार्ड, पिंजरा अधिक मजबूत करण्याचा प्रस्ताव प्राणी संग्रहालयाने प्रशासनाकडे पाठवला आहे.