Mhada News: 'म्हाडा'2 वर्षात किती घरं उभारणार, शिंदेंनी थेट आकडाच सांगितला

'म्हाडा'ने गेल्या दीड वर्षात 13 सोडतींच्या माध्यमातून सुमारे 30 हजार घरे उपलब्ध करून दिली आहेत, ही कौतुकास्पद बाब असल्याचे ते म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरांच्या उभारणीस सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.  पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील सदनिकांच्या सोडत वेळी ते बोलत होते.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गृहनिर्माण धोरणानुसार सर्वसामान्य नागरिक, काम करणाऱ्या महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतिगृह उभारले जाणार आहेत.  म्हाडा पुणे मंडळाच्या 3662 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी अनामत रकमेसह 71 हजार अर्ज प्राप्त झाले होते. अर्जदारांनी म्हाडावर दाखवलेला हा विश्वास आहे असं शिंदे यावेळी म्हणाले. अर्जदारांचा हाच विश्वास सार्थ ठरवण्यासाठी घरांच्या गुणवत्ता व सोडतीच्या पारदर्शकतेमध्ये कुठेही तडजोड न करता सोडतीतील विजेत्या अर्जदारांना तात्काळ सदनिकांचा ताबा देण्यात यावा असे निर्देशही त्यांनी दिले. सरकार विविध योजनांच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करीत आहे असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - CMO news: मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे

'म्हाडा'ने गेल्या दीड वर्षात 13 सोडतींच्या माध्यमातून सुमारे 30 हजार घरे उपलब्ध करून दिली आहेत, ही कौतुकास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लागावेत व झोपडपट्टी पुनर्विकास व्हावा यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये समूह पुनर्विकास योजनेद्वारे योजनाबद्ध गृहनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पुणे येथे ही समूह पुनर्विकास योजना राबवण्याचे ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Shirdi News: शिर्डीच्या साईमंदिर परिसरातील कुत्रे का होतायत लठ्ठ? मोठं कारण आलं समोर

म्हाडाची घरं खरेदी करण्याकडे सर्व सामान्यांचा कल असतो. परवडणारी हक्काची घरं म्हणून म्हाडाच्या घरांकडे पाहीलं जातं. त्यात आता आणखी एक लाख घरांची भर पडणार आहे. अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ही घरं ही लवकरच उपलब्ध होतील. शिवाय नवं गृहनिर्माण धोरणही जाहीर होणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. सध्याच्या महागाईच्या जमान्यात स्वस्त घरं म्हाडाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे खाजगी विकासका पेक्षा म्हाडाची घरं खरेदी करण्याकडे सर्वांचा कल दिसून येतो.