Mhada News: म्हाडाची 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' योजना, 120 सदनिकां विक्री बाबत मोठी बातमी

'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्वावर 120 सदनिका विक्री करण्यासाठी 3 जानेवारीला वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील 120 सदनिका आहेत. या सदनिका ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य'या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर 05 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून सुरू होणारी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्या दिवशी ऑनलाईन अर्ज करता येणार नाही. 

नक्की वाचा - Expressway traffic jam: पुणे एक्सप्रेस वे वाहतूक कोंडीचा फटका ST ला, जाणून घ्या किती फेऱ्या झाल्या रद्द

Advertisement

'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्वावर 120 सदनिका विक्री करण्यासाठी 3 जानेवारीला वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. यानुसार सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका दिनांक 5 जानेवारीला सकाळी 11 वाजल्यापासून https://bookmyhome.mhada.gov.in/ या म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध होईल असे नमूद करण्यात आले होते. 

नक्की वाचा - Mumbai-Pune Expressway: 40 KM वाहनांच्या रांगा, वाहतूक सुरळीत कधी होणार? पोलीस अधीक्षकांची मोठी माहिती

पंरतू, तांत्रिक अडचणीमुळे सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका ही 5 जानेवारी रोजी उपलब्ध/Upload होणार नाही. तरी सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका संकेत स्थळावर कधी उपलब्ध/Upload होईल याबाबत म्हाडाचे अधिकृत संकेत स्थळ व प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात येईल, याची कृपया अर्जदारांनी नोंद घेण्याचे आवाहन मंडळातर्फे  करण्यात आले आहे.