- म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील 120 सदनिकांच्या विक्रीसाठी आहेत
- सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार होती
- पण तांत्रिक अडचणींमुळे अर्ज नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील 120 सदनिका आहेत. या सदनिका ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य'या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर 05 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून सुरू होणारी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्या दिवशी ऑनलाईन अर्ज करता येणार नाही.
'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्वावर 120 सदनिका विक्री करण्यासाठी 3 जानेवारीला वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. यानुसार सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका दिनांक 5 जानेवारीला सकाळी 11 वाजल्यापासून https://bookmyhome.mhada.gov.in/ या म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध होईल असे नमूद करण्यात आले होते.
पंरतू, तांत्रिक अडचणीमुळे सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका ही 5 जानेवारी रोजी उपलब्ध/Upload होणार नाही. तरी सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका संकेत स्थळावर कधी उपलब्ध/Upload होईल याबाबत म्हाडाचे अधिकृत संकेत स्थळ व प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात येईल, याची कृपया अर्जदारांनी नोंद घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world