Dhananjay Munde Resign : संतोष देशमुख यांची हाल हाल करुन हत्या करण्यात आली. त्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त केला जात होता. या घटनेनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनतंर अखेर 84 दिवसांनी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा स्वीकारला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि गँगवर धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्याचा आरोप सातत्याने होत होता. संतोष देशमुखांवरील अत्याचाराचे संतापजनक फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे नेते उपस्थित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
(नक्की वाचा- संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीपासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. तर धनंजय मुंडे राजीनामा देण्यात तयार नव्हते. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानुसार धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून त्यांना पदमुक्त केले आहे. पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे.
(नक्की वाचा- Dhananjay Munde resignation : धनंजय मुंडेंना दणका; CM फडणवीसांचे राजीनामा देण्याचे आदेश?)
धनंजय मुंडेंना कलम 302 लावून जेलमध्ये टाका : मनोज जरांगे
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा नुसता राजीनामा नको, तर कलम 302 लावला पाहिजे आणि जेलमध्ये टाकलं पाहिजे. या सगळ्याला धनंजय मुंडे हेच जबाबदार आहेत. त्यांना पैसे गोड लागले. आतापर्यंत त्यांचे लोक कुणाचाही खून करायचे. पैसे मिळायचे म्हणून त्यांना मोकळं सोडलं होते. धनंजय मुंडेंचे ही लोक आहे. खंडणी मागितली, खून केल्याची त्यांना माहिती होती. धनंजय मुंडेंवर कलम 302 नुसार कारवाई झाली पाहिजे," अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.