जाहिरात

Mira Road : लग्नाच्या आणाभाका अन् धर्मांतराची सक्ती! मिरा रोडमध्ये हिंदू तरुणीसोबत घडला संतापजनक प्रकार

Mira Road forced conversion case : मुंबईजवळच्या  काशीमीरा परिसरात एका हिंदू तरुणीची मुस्लिम युवकाकडून लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Mira Road : लग्नाच्या आणाभाका अन् धर्मांतराची सक्ती! मिरा रोडमध्ये हिंदू तरुणीसोबत घडला संतापजनक प्रकार
Mira Road forced conversion case : आरोपीने तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव टाकला असून, तिला बेदम मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

रमेश शर्मा, प्रतिनिधी 

Mira Road forced conversion case : मुंबईजवळच्या  काशीमीरा परिसरात एका हिंदू तरुणीची मुस्लिम युवकाकडून लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव टाकला असून, तिला बेदम मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेचा मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला असून, काशीगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

धर्मांतराचा दबाव आणि फसवणुकीचा कट

पीडित तरुणी आणि आरोपी शाबास रज्जाक शेख यांची ओळख 2022 मध्ये मालाडमधील एका खाजगी कंपनीत झाली होती. शाबास तिथे एचआर (HR) विभागात कार्यरत होता. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचा विश्वास संपादन केला. मात्र, जेव्हा तरुणीने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आरोपीने "आमच्यात लग्नासाठी धर्मांतर करावे लागते" असे सांगून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

( नक्की वाचा : Bakrid 2026 : मिरारोडमध्ये बकरा विरुद्ध डुक्कर वाद! पूनम सोसायटीतील त्या घटनेनं वातावरण तापलं! वाचा सर्व अपडेट )
 

लिव्ह-इन रिलेशनशिप आणि दोन वेळा गर्भपात

तक्रारीनुसार, 2024 मध्ये आरोपीने काशीगाव पोलीस ठाण्याजवळ भाड्याने घर घेतले होते, जिथे हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या काळात लग्नाचे खोटे आश्वासन देऊन आरोपीने पीडितेचे शारीरिक शोषण केले. या त्रासामुळे पीडिता दोन वेळा गर्भवती राहिली, मात्र आरोपीने तिला दोन्ही वेळा जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप तरुणीने केला आहे.

भररस्त्यात मारहाण आणि पोलीस कारवाई

फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर, 28 मे 2026 रोजी पीडित तरुणी आरोपीला जाब विचारण्यासाठी हाटकेश येथील त्याच्या घरी गेली होती. यावेळी आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी तरुणीला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला असून, पीडितेने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. काशीगाव पोलिसांनी शाबास रज्जाक शेख आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

गुन्ह्याची व्याप्ती आणि कलमे

पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 313, 376(2)(ड), 323, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अत्याचार, गंभीर मारहाण, धमकी आणि फसवणूक यांसारख्या कलमांचा समावेश आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com