MLA Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यात 8 आमदारांची अनुपस्थिती, कोण आहेत आमदार?

MLA Oath Ceremony : आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन घेतलं जात आहे. 7 आणि 8 डिसेंबर रोजी एकूण 280 आमदारांनी शपथ घेतली. तर एकूण आठ आमदारांची शपथ बाकी आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीने सरकार स्थापन केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन घेतलं जात आहे. 7 आणि 8 डिसेंबर रोजी एकूण 280 आमदारांनी शपथ घेतली. तर एकूण आठ आमदारांची शपथ बाकी आहे. 

दोन दिवस सुरु असलेल्या शपथ विधी सोहळ्यात 8 आमदार अनुपस्थित राहिले होते. यामध्ये उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनिल शेळके या आमदारांचा समावेश आहे. आज उर्वरित काही आमदार शपथ घेणार आहेत. तर काही आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दालनात शपथ घेणार आहेत.

Topics mentioned in this article