Nashik News: नाशिकच्या 'या' परिसरात MNGL ची गॅस पाईपलाईन फुटली, गॅस गळतीमुळे नागरिक भयभीत

नाशिक शहरातील सिरीन मेडोज परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. या भागात एमएनजीएलची गॅस पाईपलाईन फुटली आहे.चार ते पाच तासांपासून गॅस गळती सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nashik MNGL Gas Leak News

राहुल वाघ, प्रतिनिधी

MNGL Gas Leak In Nashik : नाशिक शहरातील सिरीन मेडोज परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. या भागात एमएनजीएलची गॅस पाईपलाईन फुटली आहे.चार ते पाच तासांपासून गॅस गळती सुरू आहे. एमएनजीएलची गॅस पाईपलाईन फुटल्याने गेल्या चार ते पाच तासांपासून सातत्याने गॅस गळती सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.गॅस मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे,इतका वेळ उलटूनही घटनास्थळी अग्निशामक दल किंवा पोलीस प्रशासन पोहोचले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती असून लहान मुले,ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांची संख्या अधिक आहे.त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये,यासाठी नागरिकांनी तातडीने प्रशासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Mumbai News: मुंबई हादरली! पायधुनीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नागरिकांचा प्रचंड आक्रोश, "आरोपीला फाशी द्या.."

नाशिक महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

स्थानिकांच्या माहितीनुसार,गॅस गळतीचा तीव्र वास परिसरात पसरला असून नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण आहे.कोणतीही ठिणगी किंवा आग लागल्यास मोठी दुर्घटना घडू शकते,अशी भीती व्यक्त केली जात आहे.या घटनेमुळे नाशिक महानगरपालिकेच्या कामकाजावर आणि संबंधित यंत्रणांच्या आपत्कालीन प्रतिसादावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नक्की वाचा >> Pandharpur News: आषाढीसाठी पंढरपुरात 5500 बसेस आणि 11 हजार कर्मचारी, सरकारने मात्र वारकऱ्यांपुढे ठेवली एक अट

गॅस गळती लवकरात लवकर थांबवा

इतक्या गंभीर प्रकारानंतरही तातडीने कारवाई का झाली नाही,असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या नागरिकांनी सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात येत असून संबंधित प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचून गॅस गळती थांबवावी आणि परिसर सुरक्षित करावा,अशी मागणी जोर धरत आहे.