जाहिरात

Mumbai News: मुंबई हादरली! पायधुनीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नागरिकांचा प्रचंड आक्रोश, "आरोपीला फाशी द्या.."

मुंबईच्या पायधुनी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.पीडित मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mumbai News: मुंबई हादरली! पायधुनीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नागरिकांचा प्रचंड आक्रोश, "आरोपीला फाशी द्या.."
Mumbai Minor Girl Assault Case
मुंबई:

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai Crime News Today : मुंबईच्या पायधुनी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.पीडित मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संतप्त लोकांनी पायधुनी पोलीस ठाण्याला घेरावही घातला आहे. दरम्यान, आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पायधुनी परिसरात एका ७ वर्षांच्या निष्पाप अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने (वॉचमन) हे संतापजनक कृत्य केल्याचा संशय आहे. यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नक्की वाचा >> Pandharpur News: आषाढीसाठी पंढरपुरात 5500 बसेस आणि 11 हजार कर्मचारी, सरकारने मात्र वारकऱ्यांपुढे ठेवली एक अट

पीडित चिमुरडीला तातडीनं वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी पायधुनी पोलिस ठाण्याबाहेर एकच गर्दी केली आणि पोलिस ठाण्याला घेराव घातला.आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी संतप्त जमावाकडून रस्त्यावर उतरून 'रस्तारोको'आंदोलन करण्यात आले.

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणमध्ये 'या' भागात पत्त्यांसारखी कोसळली इमारत! थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर

आंदोलकांनी पोलिसांविरोधात आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.जमावाचा वाढता रोष आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता,पोलीस ठाणे आणि परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com