अमजद खान, प्रतिनिधी
उन्हाचा तडाखा वाढत असतानात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना विरुद्ध मनसे हा संघर्ष चांगलाच तापला आहे. माजी आमदार आणि मनसे नेते राजू पाटील यांनी एक बॅनर लावून शिवसेनेला डिवचले होते. त्याला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी प्रतिउत्तर दिलंय. राजू पाटील हे आमदार पदाची शपथ घेणार, असं त्यांनी जाहीर केलं. तसे पोस्टर त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलं. या सर्व प्रकाराची सध्या मतदारसंघात चर्चा सुरु आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकार?
डोंबिवलीतील पलावा पुलाचं काम गेल्या दोन वर्षांपासून संथगतीनं सुरु आहे. १ एप्रिलच्या निमित्ता ने मनसे आमदार राजू पाटील यांनी एक बॅनर लावला. कुणाल कामरा यांच्या हस्ते ३१ एप्रि लरोजी या दोन्ही पुलाचे उद्घाटन होणार असल्याचे त्या बॅनरवर लिहिले आहे. विद्यमान आमदार राजेश मोरे यांनी त्याला प्रतिउत्तर दिलं.
( नक्की वाचा : Dombivli ' घोटाळ्यांची चौकशी करायला पाच वर्ष कमी पडतील', राज ठाकरेंसमोर राजू पाटील यांचा निशाणा )
मोरे यांनी राजू पाटील यांची खिल्ली उडवत राजू पाटील हे आमदार पदाचे शपथ घेणार असं या पोस्टरमध्ये जाहीर केलं. मनसेच्या शैडो कॅबिनेटमध्ये निर्णय. जगभरातील राष्ट्रीय अध्यक्ष कल्याणला येणार असंही त्यांनी सांगून टाकलं. त्याचबरोबर वेळ आणि तारखेच्या जागेवर एप्रिल फुल असं मोरे यांनी लिहिलं होतं.
राजू पाटील यांनी दिलं उत्तर
राजेश मोरे यांच्या टिकेला राजू पाटील यांनी उत्तर दिलं. त्यांनी संजय निरुपम यांचा एक व्हिडिओ ट्विट केलाय. निरुपम यांनी शिंदे पिता पुत्रांवर गद्दार असल्याची टीका केल्याचा हा व्हिडिओ आहे. संजय निरुपमचा जुना व्हिडिओ टाकत मोरे साहेब मी आमदार झाल्यानंतर तुमच्या जोडीने संजय निरुपमच्या विरोधात आंदोलन करीत पलटवार केला.
एक एप्रिलच्या निमित्ताने राजकी नेते एकमेकांवर टिका करीत आहे. परंतू पूलाचे काम कधी होणार याबाबत सगळ्यांनी मौन धारण केल्याने नागरीकांमध्ये याबात दिलासा मिळावा अशी मागणी केली आहे.