- राज्य सरकारने मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने थेट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे
- मुंबईत दहिसर येथे संजय निरूपम यांनी मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षावाल्यांच्या बाजूने भूमिका घेतली होती
- मनसैनिकांनी संजय निरूपम यांच्या विरोधात आक्रमकपणा दाखवून गाडीची हवा काढली आणि दगडफेक केली होती
मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने थेट रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा फटका मुंबईतल्या अनेक परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना बसणार आहे. त्या रिक्षावाल्यांच्या बाजून शिवसेने नेते आणि माजी खासदार संजय निरूपम मैदानात उतरले होते. पण त्यांना हे पाऊल उचलणं महागात पडलं आहे. ते दहिसर इथं आले होते. तिथे त्यांनी रिक्षावाल्यांच्या बाजूने भूमीका घेतली. त्याच वेळी मनसैनिक त्यांच्या विरोधात आक्रमक झाले. त्यांनी संजय निरूपम यांच्या गाडीची हवा काढली. ऐवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक ही केली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी संजय निरूपम यांचे कार्यकर्ते आणि मनसैनिक आमने- सामने आले होते. त्यामुळे दहिसरमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यात गाडीची हवा काढली. त्यानंतर दगडफेक केली. अशा वेळी एकच गोंधळ निर्माण झाला. पोलीसांनी मनसैनिकांची धरपकड सुरू केली. मनसैनिक यावेळी आक्रमक झाले होते. मराठी सक्तीची झालीच पाहीजे. त्यात कोणता ही बदल झाला नाही पाहीजे असं मनसैनिकांचे म्हणणे होते. रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर आधी मराठी बोला असं मनसैनिकांचे म्हणणे होते.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेत मराठी रिक्षा टॅक्सी चालकांना दणका दिला आहे. 1 मे पासून जर रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नसेल तर त्यांचे परमिट जागेवर रद्द करण्यात येणार आहे. याचा धसका सर्वांनीच घेतला आहे. त्यामुळे अमराठी रिक्षा चालकांची एकच धावपळ उडाली आहे. युनियन असो की उत्तर भारतीय नेते असो त्यांच्याकडे त्यांनी धाव घेतली आहे. त्यात आता संजय निरूपम यांनी या रिक्षा चालकांची बाजू घेतली आहे. त्यांनी मराठी सक्तीला विरोध केला आहे.
या निर्णयाचा मंत्र्यांनी पुनर्विचार करावा असं त्यांच म्हणणं आहे. विशेष म्हणजे संजय निरूपम आणि परिवहन मंत्री हे एकाच पक्षाचे आहे. अशा स्थिती निरूपम यांनी पक्षाच्या विरोधातच थेट भूमीका घेतल्याची चर्चा आहे. ते म्हणतात आपण सर्व भारतीय आहोत. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. ती बोलली पाहीजे. पण त्याची सक्ती नको. सर्वांना ती शिकण्यासाठी अजून वेळ दिला पाहिजे अशी भूमीका ही त्यांनी मांडली आहे. याच वेळी मनसैनिक ते असलेल्या ठिकाणी धडकले. त्यानंतर तिथेच जोरदार राडा झाला. परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.