ठाण्याचे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणात सराफाने पोलिसात तक्रार केली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी तक्रार केल्यानंतर अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जैन यांनी वैभव ठक्कर यांना झवेरी बाजार येथील जे. के. ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलावलं होतं. त्यावेळी जाधव यांच्यासोबत असलेल्या सहा ते सात व्यक्तींनी पोलिसांसमोर जैन यांच्या मुलाला मारहाण केली आणि पाच कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोपी त्यांनी तक्रारीत केला आहे.
या प्रकरणात जाधव यांनी सर्व आरोप फेटाळले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूड भावनेने आपल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तरी पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.