आदित्य ठाकरेंच्या वरळीत राजकीय वातावरण तापले! राड्यानंतर 'सुपारीबाज'चा नवा वाद

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांच्या वरळी मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
M
मुंबई:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांच्या वरळी मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. वरळीतील जांबोरी मैदानात सुरु असलेल्या बांधकामावरुन उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्यात मंगळवारी (30 जुलै) वाद झाला होता. या वादानंतर काही तासांनीच वरळीत लागलेल्या बॅनरच्या विरोधात मनसेनं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

वरळीच्या जंबोरी मैदानात आमदार निधीतून झालेलं बांधकाम हे बेकायदेशीर असल्याचा मनसेचा आक्षेप आहे. आदित्य ठाकरेंच्या सांगण्यावरुनच हे बांधकाम झाल्याचा त्यांनी आरोप केलाय. या विषयावर मंगळवारी मनसे आणि उबाठा पक्षाचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही पक्षात झालेल्या राड्यानं मंगळवारी वातावरण तापलं होतं.

या वादानंतर काही तासांनी वरळीत बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरवर मनसे नेत्यांचा सुपारीबाज असा उल्लेख करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक कट्टा सुशोभीकरण कामात मनसेच्या सुपारीबाजांनी  व्यत्यय आणल्याचा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला होता. प्रभात मित्र परिवाराकडून हे बॅनर लावण्यात आले होते.

मनसेनं या बॅनरच्या विरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. आक्षेपार्ह बॅनर संदर्भात प्रभात मित्र परिवाराच्या सदस्यांवर कारवाईची त्यांनी मागणी केली. मनसेच्या आक्षेपानंतर मंगळवारी रात्री हे बॅनर काढण्यात आले. 

Advertisement

( नक्की वाचा : अमोल मिटकरींची कार फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा धक्कादायक मृत्यू )
 

मनसे वरळीत सक्रीय

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर मनसे कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. वरळी मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मनसेनं वरळीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मनसे नेते संदीप देशपांडे वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.