Monsoon Updates: उष्णतेच्या लाटेने होरपळणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नैऋत्य मान्सूनसाठी आता अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून मे महिन्याच्या या आठवड्याच्या अखेरीस मान्सून अंदमानात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातही प्रभाव जाणवतात, त्यामुळे उकाड्याने हैराण झालेले नागरिक आता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
नेहमीपेक्षा 5-6 दिवस आधी आगमन?
भारतीय हवामान विभागाने (IMD) विभागाने मंगळवारी (12 मे) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. सामान्यतः मान्सून 20 मेच्या सुमारास अंदमानात दाखल होतो. पण यंदाची स्थिती पाहता, पाऊस नेहमीच्या वेळेपेक्षा 5 ते 6 दिवस आधीच अंदमानात धडक देऊ शकतो. यामुळे यंदा मुख्य भूभागावरही मान्सून वेळेवर किंवा लवकर पोहोचण्याची आशा निर्माण झाली आहे.
'या' राज्यांमध्ये पावसाचा इशारा
अंदमानात मान्सून दाखल होत असतानाच दक्षिण भारतातही पावसाचा अंदाज वर्तवला जातो. पुढील चार ते पाच दिवस दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Photo Credit: NDTV Marathi
(नक्की वाचा: Heat Alert: पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट, 'या' जिल्ह्यांना धोक्याचा इशारा, तुमचा जिल्हा यात आहे का?)उष्णतेपासून सुटका कधी?भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 45 अंश डिग्रीच्या पुढे गेल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा टाळा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.