MPSC ची लिपीक, कर सहायक मुख्य परीक्षा पुढे ढकलली; तांत्रिक अडचणीमुळे निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा- 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या संवर्गाकरीता TCS या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत 1 जुलै 2024 ते 13 जुलै 2024 रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली आहे

Advertisement
Read Time: 2 mins

एमपीएससीमार्फत घेण्यात येणारी लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक संवर्गासाठीची टंकलेखन कौशल्य चाचणी (Typing Skill Test) पुढे ढकलण्यात आली आहे. तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा- 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या संवर्गाकरीता TCS या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत 1 जुलै 2024 ते 13 जुलै 2024 रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली आहे. मात्र 1 जुलै 2024 रोजी प्रथम सत्राकरिता उपस्थित उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणीदरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्धवभल्यामुळे टंकलेखन कौशल्य चाचणी पुर्ण होऊ शकली नाही. 

MPSC Exam Postpone

यामध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीचे निराकरण करण्यासाठी लागू शकणारा वेळ विचारात घेऊन 1 जुलै 2024 ते 3 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. 1 जुलै 2024 ते 3 जुलै 2024 रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी नियोजित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्याची सुधारित तारीख स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल, असं एमपीएससीकडून सांगण्यात आलं आहे.

Topics mentioned in this article