Atal Setu: 'जेवायला घरी येतो,' आईला फोनवर सांगितलं आणि पुलावर गेला! मुंबईतला डॉक्टर अद्यापही बेपत्ता

Atal Setu: मुंबईतल्या एका 32 वर्षांच्या डॉक्टरानं हॉस्पिटलमधून निघताना आईला फोन करुन रात्री जेवायला येणार असल्याचं सांगितलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
Atal Setu: डॉ. ओमकार कवितके यांची कार तसंच फोन अटल सेतूजवळ सापडले आहेत.
मुंबई:

Atal Setu: मुंबईतल्या एका 32 वर्षांच्या डॉक्टरानं हॉस्पिटलमधून निघताना आईला फोन करुन रात्री जेवायला येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्याने त्याची कार मुंबईच्या ट्रान्स हार्बर लिंकवर पार्क केली. त्यानंतर तिथून उडी मारली. जवळपास दोन दिवसांपासून पोलीस आणि तटरक्षक दलाची पथके त्याचा शोध घेत आहेत, परंतु अद्याप त्यांना यश मिळालेले नाही.

काय आहे प्रकरण?

डॉ. ओंकार कवितके हे जे.जे. हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. ते 7 जुलै रोजी त्यांच्या वाहनातून हॉस्पिटलमधून निघाले. त्यांनी त्यांच्या आईला फोन करुन घरी जेवायला येणार असल्याचं सांगितलं. आपण रात्रीचं जेवण एकत्र करु, असंही ते म्हणाले होते. 

(नक्की वाचा: Pune News : तिसऱ्या मजल्यावरच्या ग्रीलमध्ये अडकली चिमुकली, घरात कुणीही नाही! पाहा थरारक Video )
 

 मात्र, रात्री 9.43 च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की एका व्यक्तीने मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरून उडी मारली आहे. हा पूल मुंबई आणि नवी मुंबईला जोडतो आणि तो 'अटल सेतू' म्हणूनही ओळखला जातो.

या माहितीनंतर  पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना एक रिकामे वाहन आणि एक आयफोन सापडला. पोलिसांनी वाहनांच्या  क्रमांकावरून आणि फोनवरील तपशिलांवरून ते डॉ. कवितके यांचेच असल्याची खात्री केली.

(नक्की वाचा: Nimisha Priya: आई-वडिलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी परदेशात गेली निमिषा, 16 जुलै रोजी होणार फाशी!)
 

तेव्हापासून पोलीस आणि तटरक्षक दल डॉक्टरांचा शोध घेत आहेत, परंतु त्यांना यश मिळालेले नाही. या प्रकरणात कोणतीही माहिती असल्यास ती कळवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

Advertisement

(नक्की वाचा : Drug Racket: KDMC ड्रग्ज तस्कारांचा नवा अड्डा! डोंबिवलीतील आणखी एका घरात सापडला 2 कोटींचा माल )
 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Topics mentioned in this article