बोट बुडायल्या लागल्यानंतर लाइफ जॅकेटसाठी पळापळ, मावशीला गमावलेल्या गौतमने सांगितला सविस्तर घटनाक्रम!

Mumbai Boat Accident : मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला झालेल्या अपघातात एकूण 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मनोज सातवी, प्रतिनिधी 

मुंबईतील बोट अपघातात 14 जणांना जीव गमवावा लागला आहे. यात बहुतांश पर्यटक होते. उत्तर प्रदेश, गोवामधून आलेल्या प्रवाशांचा मुंबईतील समुद्रात बुडून मृत्यू झाला. नवीन वर्ष अवघ्या काही दिवसांवर आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात पर्यटनाचं प्रमाण वाढलं आहे. स्वप्ननगरी पाहण्यासाठी आलेल्या या पर्यटकांचा मुंबईनेच घास घेतला. 

Advertisement

नक्की वाचा - Mumbai Boat Accident : आई अन् मुलगा लाइफ जॅकेटसाठी बोटीच्या खाली गेले, पण..; मुंबई बोट अपघाताचं धक्कादायक वास्तव

Advertisement

मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला झालेल्या अपघातात एकूण 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या बोट दुर्घटनेमुळे नालासोपारा पूर्वेच्या गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नालासोपाऱ्यात राहणारा गौतम गुप्ता (25) याचे 12 डिसेंबर रोजी लग्न होते. लग्नासाठी त्याची मावशी रामलता देवी गुप्ता (55) आणि बहीण निनता देवी गुप्ता (30) उत्तर प्रदेशातील गाझिपूर जिल्ह्यातून नालासोपाऱ्यात आले होते. गौतम त्यांना एलिफंटा येथे फिरायला घेऊन गेला होता. मात्र रस्त्यात त्यांच्यावर काळाने घाला घातला. या दुर्घटनेत गौतमने त्याच्या बहिणीला वाचवलं, मात्र मावशी रामलता देवी हिला वाचवू शकला नाही. मुंबई बोट दुर्घटनेत गौतम गुप्ता याने आपल्या मानशीला गमावलं आहे. त्याच्या लग्नासाठी सर्व नातेवाईक नालासोपाऱ्याला त्याच्या घरी आले होते. लग्नामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. त्याची बहीण आणि मावशी पुढील काही दिवस मुंबईत राहणार होत्या. त्या पुढल्या महिन्यात उत्तर प्रदेशात परतणार होत्या. त्यापूर्वी मुंबई दर्शन घडविण्यासाठी तो दोघींना गेट वे ऑफ इंडियाला घेऊन गेला. 

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बोट बुडायला लागल्यानंतर घातलं लाइफ जॅकेट...
साधारण 3 च्या सुमारास ते बोटीत बसले. त्याचदरम्यान नौदलाची स्पीड बोट प्रवासी धडकली. यानंतर बोटीवर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर प्रवासी बोटीतील प्रवासांनी लाइफ जॅकेट घालण्यास सुरुवात केली. तोपर्यंत बोटीवरील एकानेही लाइफ जॅकेट घातलं नव्हतं. त्यानंतर घाईघाईत गौतमने बहिणीला आणि मावशीला लाइफ जॅकेट दिलं. त्याशिवाय त्याने बोटीवरील इतरांनाही लाइफ जॅकेट घालायला दिलं. तो दोघांना घेऊन बोटीबाहेर गेला. त्यावेळी कोणाला वाचवावं हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. त्यातच एक मोठी लाट आणि मावशी त्याच्यापासून वेगळी झाली. तो बहिणीला घेऊन दुसऱ्या बोटीजवळ गेला. बोटीतील लोकांनी दोघांनाही वर खेचून घेतलं. मावशीने लाइफ जॅकेट घातलं होतं, त्यामुळे तिचा जीव वाचेल असं त्याला वाटत होतं. मात्र लाइफ जॅकेट घालूनही मावशीचा जीव वाचू शकला नाही.