मुंबई शहर बेटावर पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण, MHADA ने जाहीर केल्या 82 अतिधोकादायक इमारती, पाहा संपूर्ण यादी

भाडेकरू किंवा रहिवाशांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे आणि कार्यवाहीस सहकार्य करण्याचे मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाकडून आवाहन करण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 5 mins
Mhada 82 High Risk Buildings
मुंबई:

देवेंद्र कोल्हटकर, प्रतिनिधी

Mhada High Risk Buildings :  भाडेकरू किंवा रहिवाशांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे आणि कार्यवाहीस सहकार्य करण्याचे मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाकडून आवाहन करण्यात आलं आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी 82 इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत.या 82 इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या 43 इमारतींचा समावेश आहे.

 82 अतिधोकादायक इमारतींची यादी पुढीलप्रमाणे 

  1.  ३० सी-३० डी , बोमनजी लेन 
  2. १२०, बोरा बाजार स्ट्रीट 
  3. १५, तांडेल क्रॉस लेन 
  4. १००-१०२, कांबेकर स्ट्रीट 
  5. ७१-७७, सॅम्युअल स्ट्रीट
  6. इमारत क्रमांक २३-२७, बनियन स्ट्रीट 
  7. इमारत क्रमांक ४०, बापू कोर्ट स्ट्रीट 
  8. इमारत क्रमांक ४०४-४१६, ४१६ ए, शेख मेमन स्ट्रीट, २-१८, के एम शर्मा मार्ग, सी २०८-२१५ व ९४३-४४/१२१२-१५ 
  9. इमारत क्र. ४०४-डी, काळबादेवी रोड, मुंबई
  10. इमारत क्र. १५७/३, कावेल क्रॉस लेन क्र. ५, मुंबई
  11.  इमारत क्र. ८३-८५, ट्रिनिटी स्ट्रीट 
  12. इमारत क्र. ३७७-अ, जे. एस. एस. रोड, मुंबई
  13. इमारत क्र. ७-९, रोपा लेन, मुंबई
  14. इमारत क्र. २५, नवरोजी स्ट्रीट, मुंबई
  15. इमारत क्र. २२-३४, व्ही. पी. रोड, मुंबई
  16. इमारत क्र. ५१. फर्स्ट कारपेंटर स्ट्रीट, मुंबई
  17. ३१ ए, मामा परमानंद मार्ग, गिरगांव, मुंबई ४००००४  
  18. १६-२२ ए, खत्तर अली लेन, गिरगांव, मुंबई ४००००४ 
  19. ११-१३. एम. के. रोड, गिरगांव मुंबई- ४००००४ 
  20. पाच डी, दुभाष लेन, गिरगांव, मुंबई- ४००००४ 
  21. ३१६- एबी, ११., व्ही.पी. रोड, गिरगांव, मुंबई- ४००००४ 
  22. २४७-बी, व्ही.पी. रोड, गिरगाव, मुंबई - ४००००४ 
  23. १४४-१६८, कल्याण इमारत, गिरगाव, मुंबई - ४००००४ 
  24. ८८ डी-८८जी, खाडीलकर रोड, गिरगाव, मुंबई - ४००००४
  25. ४१-४३-४५ जे एस एस रोड, गिरगाव, मुंबई - ४००००४
  26. १४, (मंचाराम निवास), शेणवी वाडी, गिरगाव, मुंबई - ४००००४
  27. १२ (विष्णू निवास), शेणवी वाडी, गिरगाव, मुंबई - ४००००४
  28.  २१-बीसी, खाडीलकर रोड, गिरगाव, मुंबई - ४००००४
  29.  इमारत क्र. ३१४-बी, व्ही.पी. रोड, गिरगांव, मुंबई- ४.
  30. इमारत क्र. ५-जे. दुभाष लेन, गिरगांव, मुंबई- ४.
  31. इमारत क्र. ६६-६६ए ६८-६८ए, तात्या घारपुरे पथ, गिरगांव, मुंबई - ४०० ००४.
  32. २२ मातृवंदना, खेतवाडी ६ वी लेन
  33. २-८. पाववाला स्ट्रिट
  34. १, खेतवाडी १२ वी लेन, वाघेला कुपर
  35. ४२७- ई. एम. एस. अली. रोड
  36. ३४६-३४८ ए, बेलासिस रोड
  37. ३, राघवजी रोड, मुंबई
  38. २५, ससेक्स रोड, माझगाव, मुंबई
  39. ८६ बी, मापलावाडी मोतीशा लेन, माझगाव, मुंबई
  40. ७-९ ए व १-९, हाथीबाग रोड
  41. १० हाथी बाग रोड
  42. २२,  नारळवाडी रोड, माझगाव मुंबई
  43. ५-१३, उनवाला बिल्डिंग, डी. एन सिंग रोड, हाथी बाग रोड
  44. २६, ससेक्स रोड माझगाव मुंबई
  45. ७६ टॅंक बंदर रोड
  46. १४५-१५९ दिग्विजय मिल चाळ काळाचौकी रोड
  47. २-१८, बाबुला टॅंक रोड
  48.  जगुली बिल्डिंग, इमारत क्र. ३१-३३. शेख हाफिजुद्दीन मार्ग / सांकली स्ट्रीट, मुंबई
  49.  गुजरिया बिल्डिंग, इमारत क्र. २४१-२४३, मौलाना आझाद रोड, मुंबई
  50.  इमारत क्र. ४४०-४४२, सर जे. जे. रोड, मुंबई
  51. इमारत क्र. ८५-९७, सोफिया झुबेर रोड व १-१५, १ ली पीरखान स्ट्रीट, मुंबई
  52.  इमारत क्र. ६७-८१, सोफिया झुबेर रोड, मुंबई
  53.  इमारत क्र. ९-११ बी, ८९-१०३, ९५-११५, १०३ए , मौलाना आझाद रोड, मुंबई
  54.  इमारत क्र. ५०-६४, मौलाना आझाद रोड, मुंबई.   
  55.  इमारत क्र. ४-६-८, मौलाना आझाद रोड, मुंबई
  56.  इमारत क्र. १८०-१९६, डिमटीमकर रोड, १११-१२१, न्यू नागपाडा रोड, मरियम मंझिल, मुंबई
  57. इमारत क्र. १०, मौलाना आझाद रोड, मुंबई
  58. इमारत क्र. १२-२०, मौलाना आझाद रोड, मुंबई
  59. इमारत क्र. ३५, कामाठीपुरा १० वी लेन
  60. इमारत क्र. ६५-११, कामाठीपुरा ११ वी लेन
  61. नूर मंझिल, इमारत क्र. ६४२-६४४, फॉकलंड रोड, मुंबई
  62. लक्ष्मी बिल्डिंग, इमारत क्र. ८८-९०, ९०-९२, क्लेअर रोड, मुंबई
  63. इमारत क्र. १४-ABCD,रिटेबल स्ट्रीट, मुंबई
  64. इ.क्र. १०० डी न्यू स्टार मेन्शन, के.के. रोड
  65. कोळी चाळ नं. ३-३ ए, गणपतराव कदम मार्ग
  66. ३८-४०-४० ए, लक्ष्मी बिल्डिंग, भाउसाहेब तोडणकर मार्ग, एलफिस्टन रोड
  67. १०० ई, मेहर लॉज, के. के. रोड, सातरस्ता
  68. ३७३ ए साई प्रसाद, मुरारी घाग मार्ग,
  69. १४ फितवाला बिल्डिंग, एलफिस्टन रोड
  70.  ९८ हाजी कासम चाळ, शाहीर अमर शेख मार्ग
  71. १४-१४ ए, १६-१६ ई, खरास बिल्डिंग, ना म जोशी मार्ग
  72. ४८, विरा बिल्डिंग, जगन्नाथ भातणकर रोड
  73. ४६ दया विरा बिल्डिंग, जगन्नाथ भातणकर रोड
  74.  ८-८ सी, २६- २६ एफ, कॉर्नर चेंबर्स, शिवाजी पार्क रोड नं. ५, दादर, मुंबई उपकर क्रमांक GN-४८७८ (१)  
  75.  ४३- ४५, गोरेगावकर वाडी, पोतुगीज चर्च रोड, दादर (प), उपकर क्रमांक GN- ३२३८ (२), GN-३२३६ (४),GN-३२३८ (१), GN-३२३६ (३)   
  76. हेदवकर वाडी क्र.२, द. स. बाबरेकर मार्ग, गोखले रोड,   (उ), दादर (प), मुंबई उपकर क्रमांक GN- ४४४४(३)
  77.  ३६, कुबल निवास, गोखले रोड, दादर (प), मुंबई
  78.  इमारत क्र. ३९-३९ अ व ४१-४१ ए, इलम महल, एस. के. बोले. रोड, दादर (प), मुंबई-२८
  79.  इमारत क्र. २० जमाल हाऊस, दर्गा स्ट्रिट माहिम, मुंबई-१६
  80.  इमारत क्र.७ अअ, आनंद भुवन (जुनी) शिवाजी पार्क, रोड क्र.४, दादर-पश्चिम, मुंबई
  81.  इमारत क्र. २७४-२७४ ए,  मिनर्वा बिल्डींग, उपकर क्र. फ द-८२५ [१ए]. माधवदास पास्ता रोड, दादर (पू ) मुंबई ४०००१२
  82. इमारत क्र.१८४-१८४ एफ मिनर्वा मेन्शन, उपकर क्र. फ द-८२५ [१], डॉ. बी. ए. रोड, दादर (पू), मुंबई ४०००१२

नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील 'या' प्रमुख मार्गावर मोठी वाहतूक कोंडी, 6 ते 7 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, काय घडलंय?

या अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये २२५६ निवासी व ४८० अनिवासी असे एकूण २७३६ भाडेकरू किंवा रहिवासी आहेत. मंडळातर्फे १७६ निवासी गाळेधारकांना गाळे खाली करण्याकरिता नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस बजावलेल्या भाडेकरू किंवा रहिवासी यांच्यापैकी २९ निवासी भाडेकरू किंवा रहिवासी मंडळाच्या संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित झाले आहेत. ३६ निवासी भाडेकरू किंवा रहिवासी यांनी स्वतःची निवार्यासची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे.

Advertisement

उर्वरित इमारतींमधील भाडेकरु किंवा रहिवासी यांना निष्कासनाच्या सूचना देण्यात आलेल्या असून गाळे खाली करवून घेण्याची कार्यवाही मंडळातर्फे सुरू आहे.तसेच २१०२ भाडेकरू  किंवा रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असल्याने मंडळातर्फे त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. या अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशी किंवा भाडेकरु यांना आवश्यकतेनुसार मंडळातर्फे जागा खाली करण्याच्या नोटीस देण्यांत येतील व त्यांची पर्यायी व्यवस्था संक्रमण शिबिरात करण्याची कार्यवाही करण्यांत येईल. 

नक्की वाचा >> Pune News: पुण्याच्या राजगडमध्ये दबक्या पावलांनी 'तो'आला, पानशेत खोऱ्यात व्हिडीओ काढताना लोकांचा थरकाप उडाला

अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरू किंवा रहिवाशांना मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे की,त्यांनी मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्याकामी सहकार्य करावे व त्यांच्या व आपल्या परिजनांच्या सुरक्षेकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे जेणेकरून अपघात होऊन होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल.तसेच मंडळाचा नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असल्याने इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तथा अपघात घडल्यास नियंत्रण कक्षास सूचित करण्यात यावे,असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.