Mumbai Crime News: बहीण दुबईत, भाऊ अमेरिकेत, मुलं सीए-इंजिनिअर, तरीही अट्टल चोर; एका गोष्टीमुळे अडकला

मोहन कोकाटे (49 वर्ष) असे या आरोपीचे नाव असून तो सायन परिसरात राहतो. आरोपीने स्वतःची ओळख पटू नये म्हणून अत्यंत सावधगिरी बाळगली होती. मात्र पोलिसांनी त्याच्या एका सवयीचा फायदा घेत त्याला बेड्या ठोकल्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Crime News: मुंबई आणि नवी मुंबई परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या एका हायप्रोफाईल साखळी चोराला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. स्वतःची ओळख लपवण्यासाठी आरोपीने कपड्यांपासून हेल्मेटपर्यंत सर्वकाही बदलले, पण त्याच्या 'पायातील बुटांनी' मात्र त्याला अडकवलं. 80 सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या चोराचा माग काढला.

मोहन कोकाटे (49 वर्ष) असे या आरोपीचे नाव असून तो सायन परिसरात राहतो. आरोपीने स्वतःची ओळख पटू नये म्हणून अत्यंत सावधगिरी बाळगली होती. मात्र पोलिसांनी त्याच्या एका सवयीचा फायदा घेत त्याला बेड्या ठोकल्या.

Advertisement

बुटांनी उघड केले गुपित

आरोपी मोहन कोकाटे हा प्रत्येक चोरीच्या वेळी वेगळे कपडे परिधान करत असे आणि डोक्यावर हेल्मेट घालत असे, जेणेकरून त्याचा चेहरा दिसू नये. मात्र, पोलिसांनी जेव्हा 80 सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा त्यांना एक साम्य आढळले. आरोपीने प्रत्येक घटनेत एकाच प्रकारचे बूट घातले होते. हेच बूट पोलिसांसाठी सर्वात मोठा पुरावा ठरले.

(नक्की वाचा- Mumbai News: शिमल्याला फिरायला जाणं जीवावर बेतू शकतं! मुंबईतील महिलेसोबत काय घडलं? वाचा)

'हायप्रोफाईल' कुटुंब, पण सवय वाईट

पोलीस तपासात कोकाटेच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीचे कुटुंब अत्यंत सुशिक्षित आहे. त्याची बहीण दुबईत तर भाऊ अमेरिकेत राहतो. त्याचा एक मुलगा चार्टर्ड अकाउंटंट (CA) आहे आणि दुसरा इंजिनियर आहे. कोकाटेला ऑनलाइन कॅसिनो आणि जुगाराचे व्यसन आहे. या व्यसनापायी त्याने वडिलांसोबत असलेला गार्डनिंगचा व्यवसाय गमावला आणि तो मोठ्या कर्जात बुडाला. कर्ज फेडण्यासाठी त्याने गुन्हेगारीचा मार्ग निवडला.

सायनमधील घटनेने दिला सुगावा

25 जानेवारी रोजी सायनमध्ये एका महिलेचे मंगलसूत्र चोरून तो पळाला होता. विशेष म्हणजे, ते मंगलसूत्र नकली होते. सुरुवातीला महिलेने तक्रार देण्यास नकार दिला. पण पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर एफआयआर दाखल केला. पोलिसांनी तपास केला असता आरोपीने वापरलेली दुचाकी देखील नेरुळवरून चोरलेली असल्याचे निष्पन्न झाले. फक्त जानेवारी महिन्यातच त्याच्यावर 5 गुन्हे दाखल झाले असून, त्याने मुंबईत 20 हून अधिक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.