दहिहंडी दरम्यान किती गोविंदा झाले जखमी? किती जण गंभीर? आकडेवारी आली समोर

अनेक गोविंदा हंडी फोडताना जखमी झाले आहेत. त्यातले काही गंभीर आहेत. तर काहींना उपचार करून सोडण्यातही आले आहे. त्याची आकडेवारी आता समोर आली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

दहिहंडी उत्सव मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा झाला. बालगोपाळांनी दहिहंडी फोडण्याचा आनंद संपूर्ण मुंबईत लुटला. पण या दरम्यान काही अप्रीय घटना ही घडल्या आहेत. त्यात अनेक गोविंदा हंडी फोडताना जखमी झाले आहेत. त्यातले काही गंभीर आहेत. तर काहींना उपचार करून सोडण्यातही आले आहे. त्याची आकडेवारी आता समोर आली आहे.मुंबईतल्या जवळपास 204 रूग्णालयात या जखमी गोविंदावर उपचार केले गेले आहेत.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबईत किती गोविंद जखमी झाले याची आकडेवारी आता समोर आली आहे. त्यानुसार दिवसभरात 238 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यातल्या 32 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 204 जणांना उपचार करून सोडून देण्यात आले आहेत. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यातले दोन जण गंभिर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या सर्वांवर महापालिका आणि सरकारी रूग्णालयात उपचार केले गेला आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - मोहन भागवतांना आता पंतप्रधान मोदींच्या दर्जाची सुरक्षा, अचानक का केले बदल?

दहिहंडी दरम्यान जखमी झालेल्यांवर मुंबईत वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार करण्यात आले. जेजे रूग्णालयात 04, सेंट जॉर्जमध्ये 08, पोद्दारमध्ये 18 जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर सर्वाधिक जखमी हे KEM रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातल्या 11 जणांवर अजूनही उपचार सुरू असून 41 जणांना उपचार करून सोडण्यात आले आहेत. दोन गोविंदा मात्र गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?

मुंबईत गोविंदाच्या जीवाला काही होवू नये यासाठी सर्व उपाययोजना दहिहंडी आयोजकांनी केल्या होत्या. शिवाय त्याबाबतची काळजीही गोविंदा पथकं घेत होती. त्यामुळे मोठी हानी कुठेही झाली नाही. अनेक गोविंदांना किरकोळ मार लागल्याचे समोर आले आहेत. त्यांना उपचार करून लगेचच सोडण्यातही आले आहेत.एकंदरीत दहिहंडीचा उत्साह मुंबईत पाहायला मिळाला आहे. 

Advertisement