जाहिरात

मोहन भागवतांना आता पंतप्रधान मोदींच्या दर्जाची सुरक्षा, अचानक का केले बदल?

मोहन भागवतांना आता पंतप्रधान मोदींच्या दर्जाची सुरक्षा, अचानक का केले बदल?
नागपूर:

शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (RSS Mohan Bhagwat) यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. भागवतांना पंतप्रधान मोदीं इतकी सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र अचानक सुरक्षेत वाढ का करण्यात येत आहे, याबद्दल सवाल उपस्थित केले जात आहे. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोहन भागवतांना आधी झेड प्लस सुरक्षा होती, त्यात वाढ करून एडवान्स सिक्युरिटी लाइजन (ASL) पर्यंत करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही इतकीच सुरक्षा दिली जात आहे. 

नक्की वाचा - शरद पवारांची सुरक्षा वाढवली; केंद्राकडून मिळाली झेड प्लस सुरक्षा, पण कारण काय?

मोहन भागवतांना कोणाची भीती?
भागवतांची सुरक्षा का वाढविण्यात आली, याबद्दल सवाल उपस्थित केला जात आहे. त्यांना पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांइतकी सुरक्षा देण्यात आली? त्यांना कोणाची भीती आहे? टीओआयच्या सूत्रांनुसार, भागवतांच्या सुरक्षेच्या समीक्षेनंतर ही वाढ करण्यात आली आहे. कथितपणे भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांचे राज्य असलेल्या राज्यांमध्ये भागवतांच्या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत काही कमतरता आढळली होती. ज्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. भागवत हे अनेक कट्टरपंथी मुस्लीम संघटनांसह अनेक संघटनेंच्या निशाण्यावर असल्याचं सांगितलं जात आहे. 

ASL सुरक्षेत काय काय असतं?
ASL अंतर्गत संरक्षण देणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेशी संबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य आणि या स्तरावरील इतर विभागांचा सहभाग अनिवार्य आहे. यात बहुस्तरीय सुरक्षा घेरासह तोडफोडविरोधी तपासाचा समावेश आहे. हेलिकॉप्टर प्रवासाला केवळ खास डिझाइन केलेल्या हेलिकॉप्टरमध्ये परवानगी दिली जाईल आणि ते ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार चालतील.

Switch To Dark/Light Mode
Previous Article
Nabanna March Kolkata डाव्यांना आणि काँग्रेसलाही जे जमले नाही ते 3 विद्यार्थ्यांनी करून दाखवले, ममता बॅनर्जी जबरदस्त टेन्शनमध्ये
मोहन भागवतांना आता पंतप्रधान मोदींच्या दर्जाची सुरक्षा, अचानक का केले बदल?
Amravati  Navneet Rana criticizes MLA Bachchu Kadu
Next Article
'धोकेबाजांचा हिशेब होईल'कडूंच्या बालेकिल्ल्यात राणा कडाडल्या,काय काय बोलून गेल्या?