गुरूप्रसाद दळवी, प्रतिनिधी
Mumbai-Goa Highway Latest Update : मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डे तिठा ओव्हर ब्रीजचा स्लॅबचा मधला भाग अचानक कोसळल्याची घटना शनिवारी घडली. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यापासून हा मार्ग नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण या महामार्गावर अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत.अशातच कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे चक्क ब्रिजचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीनं महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या पावसात पहिल्यांदा हा स्लॅब पडला होता.यानतंर शनिवारी पुन्हा सकाळी यातील काही भाग पडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.रस्त्याच्या मधोमध मोठ्या स्लॅबचा भाग पडल्याने वाहतुकीस धोका निर्माण होण्याची शक्यता होती.यासाठी सहदेव खाड्ये,उपसरपंच गणेश पाताडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बॅरिकेट लावून वाहतूक बंद केली.प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांशी चर्चा केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली.
नक्की वाचा >> PM Narendra Modi : पेट्रोल-डिझेल, सोनं खरेदीबाबत PM नरेंद्र मोदींचं देशवासीयांना सर्वात मोठं आवाहन, म्हणाले..
त्या महामार्गाचं काम प्रगतीपथावर
मागील जूनमध्ये महामार्ग उपविभाग खारेपाटण कार्यालयातील अभियंता अतुल शिवनिवार याची नागपूर येथे बदली झाल्यानंतर हे पद अजूनही रिक्त आहे.याचा प्रभार उपविभाग सावंतवाडीच्या अभियंता वृषाली पाटील यांच्याकडे आहे. मात्र खारेपाटण कार्यालयात त्या कायम मिळत नाही. त्यात मुंबई-गोवा महामार्ग व तळेरे-कोल्हापूर महामार्ग काम आजही प्रगतीपथावर असल्याने कायस्वरूपी अभियंता नेमणूक करण्याची गरज आहे.तरी खारेपाटण उपविभाग कार्यालयात लवकरच अभियंता मिळावा अशी मागणी होऊ लागली आहे.
नक्की वाचा >>CM विजय यांचं भाषण सुरु होतं, अचानक त्रिशा कृष्णननं असं काही केलं..फिल्म इंडस्ट्रीसह राजकारणात चर्चा, VIDEO
वाहतूक तिसऱ्या लेनवरून वळवली
मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे उड्डाणपुल येथे स्लॅबच्या प्लास्टरचा भाग कोसळला असून त्यातील स्टिल बाहेर दिसत आहे.घटनास्थळी भेट दिली.त्याठिकाणी डागडुजी करण्यासाठी संबंधित टीम आली होती.वरील भागावरुन वाहतूक होऊन आणखीन धोका होऊ नये,म्हणून महामार्ग उड्डाणपुलावरील वाहतूक तिसऱ्या लेनवरुन वळवण्यात आली आहे.या भागाची लवकरात लवकर दुरुस्ती होईल,अशी माहिती महामार्ग प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता देवीदास कुमावत यांनी दिली. गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.तसच याबाबत पं.स.सदस्य सहदेव ऊर्फ आण्णा खाडये यांनी आ.प्रमोद जठार यांना माहिती दिली.