जाहिरात

CM विजय यांचं भाषण सुरु होतं, अचानक त्रिशा कृष्णननं असं काही केलं..फिल्म इंडस्ट्रीसह राजकारणात चर्चा, VIDEO

थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. परंतु,अभिनेत्री त्रिषा कृष्णनच्या उपस्थितीची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली.

CM विजय यांचं भाषण सुरु होतं, अचानक त्रिशा कृष्णननं असं काही केलं..फिल्म इंडस्ट्रीसह राजकारणात चर्चा, VIDEO
Trisha Krishnan At CM Vijay Oath Ceremony

Thalapathy Vijay Oath Ceremony : थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. परंतु,अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या उपस्थितीची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली. या सोहळ्यादरम्यान त्रिशा विजय यांची आई शोभा चंद्रशेखर यांना भेटली आणि बघता बघता तिचे व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये शपथविधीचा हा सोहळा रंगला. यावेळी त्रिशाने विजय यांची आई शोभा यांची भेट घेतली. दोघींनीही व्हिआयपी सीटवर बसण्याआधी एकमेकींना गळाभेट दिली. 

या सोहळ्यासाठी त्रिशाने सोनेरी रंगाचे मोटिफ्सचे ब्लाऊज आणि फिकट हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. पण या सोहळ्या दरम्यान त्रिशा खूप भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. तिने केसांना पांढऱ्या रंगाचा गजराही लावला होता. त्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुललं होतं. तसच रेड स्टोन ज्वेलरी आणि हलक्या मेकअपमध्ये त्रिशा पारंपारिक लूकमध्ये सजली होती.

नक्की वाचा >> Amravati News: 15 मित्रांच्या किंकाळ्या अन् आरडाओरडा, 2 सख्ख्या भावंडांसह एकापाठोपाठ 4 जणांचा जीव गेला

त्रिशाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आणि..

विजय आणि त्रिशा तामिळ फिल्म इंडस्ट्रीच्या सर्वात लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक आहे.त्रिशाने घिल्ली,थिरुपाची,आथी,कुरुवी आणि नुकतच लियोसारख्या सिनेमात झळकले आहेत.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की,विजय हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना त्रिशाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं.ती खूप भावनिक झाल्यासारखी दिसत होती. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळत होते. 

नक्की वाचा >> Dombivli News: डोंबिवलीतील 'तो' अनधिकृत बंगला कोणाचा? एकटी महिला प्रशासनाला भिडली, 7 दिवसांपासून आमरण उपोषण

थलपती विजय बनले मुख्यमंत्री

मागील काही दिवसांपासून थलपती विजय यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही तुफान चर्चा रंगली होती. त्रिशा आणि विजय यांचं अफेअर असल्याच्याही चर्चा इंटरनेटवर रंगल्या होत्या.पण दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या नात्याबाबत अनेक उलटसुलट चर्चाही आहेत.काही यूजर्सने म्हटलं आहे की,विजयच्या घटस्फोटाच्या चर्चा जेव्हा रंगू लागल्या, तेव्हा काही राजकीय नेत्यांनी विजय आणि त्रिशात प्रेमसंबंध असल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं होतं.काही महिन्यांपूर्वी विजय आणि त्रिशा एकाच कारमध्ये एकत्रित स्पॉट झाले होते.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com