जाहिरात

Dombivli News: डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरण!रमेश म्हात्रेंसह त्यांच्या तीन कार्यकर्त्यांना मोठा दणका,जामीन रद्द

शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांचे तीन कार्यकर्ते प्रमोद निकम,रमेश पवार आणि अक्षय करांदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Dombivli News: डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरण!रमेश म्हात्रेंसह त्यांच्या तीन कार्यकर्त्यांना मोठा दणका,जामीन रद्द
Ramesh Mhatre Bail Rejected

Ramesh Mhatre Latest News : शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांचे तीन कार्यकर्ते प्रमोद निकम,रमेश पवार आणि अक्षय करांदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची (सुमोटो) दखल घेत रमेश म्हात्रे आणि अन्य तिघांना मंजूर करण्यात आलेला जामीन रद्द केला आहे.

रमेश म्हात्रे चार दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नव्हते

या प्रकरणात रमेश म्हात्रे यांना वैद्यकीय कारणास्तव (मेडिकल ग्राउंड) जामीन मिळाला होता.रमेश म्हात्रे गेल्या चार दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती आहे.ते अज्ञातवासात गेल्याची माहिती आहे.त्यानंतर कल्याण न्यायालयाने रमेश म्हात्रे यांच्या इतर कार्यकर्त्यांच्या जामीन मंजूर केला होता. शनिवारी सकाळी आरोपींची आधारवाडी कारागृहातून सुटका होण्याची तयारी सुरू होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतल्याने परिस्थितीत मोठा बदल झाला.

नक्की वाचा >> Nashik News : तब्बल 200 तोळे सोन्याची फसवणूक, सराफा व्यावसायिकाने नाशिकच्या माजी महापौरांना घातला गंडा

रमेश म्हात्रे आणि अन्य तिघांचा जामीन रद्द करण्याचे आदेश

उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रे आणि अन्य तिघांचा जामीन रद्द करण्याचे आदेश दिले.त्यानंतर आधारवाडी कारागृह प्रशासनाने त्यांच्या सुटकेची प्रक्रिया तातडीने थांबवली.याशिवाय,उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रे यांना रविवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण जाण्याचे निर्देश दिले आहेत.या प्रकरणावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार असून,या निर्णयामुळे रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com