Mumbai Local: एकाच प्लॅटफॉर्मवर दोन लोकल समोरा-समोर, मोठा अपघात टळला, गोंधळ मात्र वाढला

या घटनेनंतर सीएसएमटी स्टेशन मास्तर यांना निलंबित करण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर बदलापूरहून येणाऱ्या जलद लोकलला चुकीच्या सिग्नल देण्यात आला
  • प्लॅटफॉर्म पाचवर आधीच उभी असलेल्या दुसऱ्या लोकलमुळे मोटरमनने तातडीने ब्रेक लावून मोठा अपघात टाळला
  • स्टेशन मास्तर यांना सिग्नल यंत्रणेत चूक झाल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

रिझवान शेख 

मध्य रेल्वेवर रोज काही ना काही होतच असते. डोंबिवलीत लोकल रूळावरून घसरल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा मोठा अपघात टळला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बदलापूरहून येणारी जलद लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर येणे अपेक्षित होते. पण त्या ऐवजी चुकीने ही लोकल  प्लॅटफॉर्म 5 कडे वळवली गेल. पण प्लॅटफॉर्म क्रमांकावर आधीच एक लोकल उभी होती. मात्र मोटरमनने प्रसंगावधान दाखवत तत्काळ गाडीचे ब्रेक लावले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. काही वेळासाठी दोन लोकल एकमेकांच्या समोर होत्या. या घटनेनं सीएसएमटीमध्ये एकच खळबळ उडाली. प्रवाशांमध्ये गोंधळ आणि भीती निर्माण झाली. क्षणभर काय होत आहे हे ही समजले आहे. 

या घटनेनंतर सीएसएमटी स्टेशन मास्तर यांना निलंबित करण्यात आले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने ही मोठी कारवाई केली आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर बदलापूर फास्ट लोकल ट्रेनला प्लॅटफॉर्म क्रमांक 04 ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरचा चुकीचा सिग्नल दिल्या मुळे दोन लोकल समोरा समोर आल्या होते. याघटनेनंतर स्टेशन मास्तरला तत्काळ निलंबन करण्यात आला आहे. दोन लोकल समोरा समोर कशामुळे आल्या, स्टेशन मास्तरचा काम आहे सिग्नल यंत्र बघणं, पण त्यांनी ते केलं नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. मात्र मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला.या विचित्र घटनेमुळे सीएसएमटी स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

Advertisement

नक्की वाचा - Alcohol Effects: उन्हाळ्यात दारू पिताना काय काळजी घ्याल? 'या' चुका टाळा नाही तर होईल मोठा घात

या घटनेचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर दिसून आला होता. ऐन गर्दीच्या वेळी सीएसएमटीवर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. बदलापूरहून येणारी जलद लोकल अचानक प्लॅटफॉर्म 5 कडे गेली. तिथे आधीच दुसरी लोकल उभी होती. हे लक्षात येताच तत्परता दाखवत मोटमनने ब्रेक लावले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दोन्ही गाड्यांमध्ये केवळ एका डब्याएवढे अंतर शिल्लक राहिले होते. अन्यथा मोठा अपघात घडला असता, असे प्रवाशांकडून सांगण्यात आले आहे. ही घटना सिग्नल यंत्रणेत बिघाड आणि ट्रॅक कंट्रोल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र त्याबाबत मध्य रेल्वेने अजून स्पष्टीकरण देण्यात आले नाही. 

नक्की वाचा - Kolhapur News: व्याजाच्या बदल्यात शरीरसुख! तरुणी वाईट फसली, कधी लॉज कधी, कधी गाडीतच संबंध, Video ही काढले

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली होती. बदलापूरहून आलेली लोकल मागे घेतली गेली. त्या लोकलला दुसऱ्या ट्रॅकवरून पुढे काढण्यात आले. पण या विचित्र घटनेमुळे सीएसएमटी स्थानकातील 5 ते 8 क्रमांकाचे प्लॅटफॉर्म काही काळ बंद ठेवण्यात आले होते. यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले, परिणामी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. गाड्या नियोजित वेळेपेक्षा काहीकाळ उशिरा धावत होत्या. यामुळे प्रवाशांमध्ये ही गोंधळ निर्माण झाला. काही वेळात लोकल सेवा पुर्ववत झाली. तर या घटनेची चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु ही नेमकी घटना कशामुळे घडली? कर्मचाऱ्यांच्यावरती कामाचा ताण होता की, त्यांना सिग्नल यंत्रणाबाबत अचूक प्रशिक्षण दिले नाही. याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच सीएसएमटी स्थानकातील स्टेशन मास्तर यांना सस्पेंड करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी दिले आहे.